एअरटेलची 5G सेवा कधी होणार सुरू? जाणून घ्या ...

Airtel 5G सेवा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने लॉन्चची तारीख आणि 5G प्लॅनच्या किंमतीबद्दल माहिती दिली आहे.
Airtel Network
Airtel Network Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतात लवकरच 5G सेवा सुरू होऊ शकते. देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेल भारतात 5G स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण झाल्यानंतर 5G सेवा सुरू करेल. नुकत्याच हाती अलेल्या वृत्तानुसार, कंपनीच्या मुख्य तांत्रिक अधिकाऱ्याने गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की कंपनी 5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर 2 ते 3 महिन्यांत 5G सेवा सुरू करेल. एअरटेल CTO ने गुरुवारी झालेल्या 5G नेटवर्क डेमो दरम्यान ही माहिती दिली आहे.

Airtel Network
BOB Recruitment : 'या' 159 पदांसाठी होणार भरती

हा डेमो सरकारने टेलिकॉम कंपन्यांना चाचणीसाठी दिलेल्या 3500MHz च्या बँडवर केला होता. एअरटेलचे सीटीओ रणदीप सेखॉन यांनी सांगितले की स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण झाल्यानंतर एअरटेल (Airtel Networking) 5G सेवा दोन ते तीन महिन्यांत सुरू केली जाईल.

Airtel 5G ची किंमत किती असेल,

ते म्हणाले, आम्हाला विश्वास आहे की स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण झाल्यानंतर एअरटेल 5G (Airtel 5G) लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. Airtel एक्झिक्युटिव्हने सांगितले की, भारतातील 5G ​​प्लॅनची ​​किंमत 4G प्लॅन्स सारखीच असेल ज्यासाठी भारतीय वापरकर्ते सध्या पैसे देत आहेत. एअरटेलने गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या 5G नेटवर्क स्पीडचा डेमो दाखवला.

डेमो कंपनीने 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देव यांच्या खेळीचा व्हिडिओ दाखवला. एअरटेलने 50 समवर्ती वापरकर्त्यांसह 4K व्हिडिओ प्ले केला, ज्यामध्ये वापरकर्त्यांना 200mbps ची सरासरी गती मिळत होती. आम्ही तुम्हाला सांगूया की गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एअरटेलने हैदराबादमध्ये 5G नेटवर्कचा डेमो दाखवला होता. कंपनीने जूनमध्ये गुरुग्राममध्ये 5G नेटवर्कची चाचणी घेतली होती, ज्यामध्ये 1Gbps स्पीड आढळून आला होता. कंपनीने गेल्या वर्षी क्वालकॉमसोबत भागीदारी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com