GST  Dainik Gomantak
अर्थविश्व

GST Council Meeting: जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय, ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कसिनोवर आता 28 टक्के GST

GST Council Meeting: जीएसटी कौन्सिलच्या 50 व्या बैठकीत ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोवर 28 टक्के कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Manish Jadhav

GST Council Meeting: जीएसटी कौन्सिलच्या 50 व्या बैठकीत ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कसिनोवर 28 टक्के कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय, बैठकीत निर्णय घेताना जीएसटी कौन्सिलने सिनेमागृहांमधील खाण्यापिण्यावरील जीएसटीचा दर कमी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. सिनेमागृहात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर यापूर्वी 18 टक्के जीएसटी आकारला जात होता, मात्र आता तो कमी करुन 5 टक्के करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

दुसरीकडे, जीएसटी कौन्सिलने मल्टी यूजर व्हेईकलवर म्हणजेच एमयूव्हीवर 28 टक्के जीएसटी रेटवर 22 टक्के कंपनसेशन सेस लावण्याची शिफारस स्वीकारली आहे. यामध्ये सेडान कारचा समावेश नाही.

पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील GST परिषदेला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्रीही उपस्थित होते.

त्याचवेळी, तज्ञांचे म्हणणे आहे की, गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कसिनोवर 28% जीएसटी लावल्याने गेमिंग उद्योगाचे मोठे नुकसान होऊ शकते. NA शाह असोसिएट्सचे पाटर्नर पराग मेहता म्हणाले की, 28% GST लावल्याने ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल.

दरम्यान, जीएसटी (GST) कौन्सिलने कॅन्सरवरील औषध डिनुटुक्सिमाब आणि विशेष वैद्यकीय उद्देशासाठी भोजन (FSMP) आयातीवर जीएसटी सूट मंजूर केली आहे. हे औषध दुर्मिळ रोगांच्या उपचारांमध्ये वापरले जाते.

महाराष्ट्राचे वन संस्कृती आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जीएसटी परिषदेनेही अपीलीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. अनेक दिवसांपासून ही मागणी होत होती.

बैठकीपूर्वी शॉर्ट फिल्म जारी

देशाची राजधानी दिल्लीत आयोजित बैठकीच्या सुरुवातीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 'जीएसटी कौन्सिल - प्रवासाच्या दिशेने 50 पावले' नावाची शॉर्ट फिल्म जारी केली. तत्पूर्वी, अर्थमंत्र्यांच्या कार्यालयाने ट्विट केले की, "आतापर्यंत झालेल्या 49 बैठकांमध्ये कौन्सिलने सहकारी संघराज्याच्या भावनेने सुमारे 1,500 निर्णय घेतले आहेत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT