Reliance JIO

 

Dainik gomantak

अर्थविश्व

Jio वापरकर्त्यांना कंपनीचा इशारा, बँक खातं होऊ शकतं रिकाम

अशा फ्रॉड कॉल्सबाबत वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

ऑनलाइन घोटाळे खूप वेगाने वाढत आहेत. रिलायन्स जिओनेही आता आपल्या ग्राहकांना याबाबत सावध केले आहे. ई-केवायसी घोटाळा टाळण्यासाठी कंपनीने काही टिप्सही दिल्या आहेत. यापूर्वी एअरटेल आणि व्होडाफोननेही या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या ग्राहकांना सावध केले होते.

ई-केवायसी व्हेरिफिकेशनच्या नावावर होणारी फसवणूक टाळा अस रिलायन्स जिओने (jio) म्हटले आहे. ई-केवायसी व्हेरिफिकेशनच्या नावाने येणाऱ्या कॉल्स किंवा मेसेजला प्रतिसाद देऊ नका. यामध्ये फसवणूक करणारे युजर्सला केवायसी व्हेरिफिकेशनच्या नावाने कोणत्याही नंबरवर कॉल करण्यास सांगतात. अशा फ्रॉड कॉल्सबाबत वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

केवायसी अपडेटसाठी अॅप डाउनलोड करू नका केवायसी अपडेटसाठी तुमच्या फोनवर किंवा पीसीवर कोणतेही अॅप डाउनलोड करू नका.

आवश्यक तपशील शेअर करू नका कंपनी आणि सायबर (Cyber) तज्ञांच्या मते, ग्राहकांना आधार क्रमांक, ओटीपी, बँक (bank) खाते क्रमांक यासारखे आवश्यक तपशील कोणालाही देण्याची गरज नाही. जिओची (goa) बनावट ग्राहक सेवा बनून ते ग्राहकांकडून आवश्यक तपशील मागतात, असे म्हटले आहे. फसवणूक टाळण्यासाठी हे कोणाशीही शेअर करू नका.

ई-केवायसी पूर्ण न झाल्यास सीम बंद केले जाईल, असे सांगितले जाते. मात्र ग्राहकांनी घोटाळेबाजांच्या फंदात पडू नये.

मेसेजमध्ये आढळलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, जिओने म्हटले आहे की, ज्या मेसेजमध्ये ई-केवायसीबद्दल बोलले जात आहे त्या मेसेजमधील लिंकवर ग्राहकांनी क्लिक करू नये. ग्राहकांनी इतर अज्ञात लिंकवर क्लिक करणे देखील टाळावे. कंपनीने सांगितले की ते ग्राहकांना My Jio अॅप व्यतिरिक्त कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करण्यास सांगणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT