air india Dainik Gomantak
अर्थविश्व

एअर इंडिया अन् एअर एशियाच्या प्रवाशांसाठी टाटाची खास ऑफर

एअर इंडिया आणि एअर एशिया इंडिया यांच्यातील परस्पर सहकार्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे.

दैनिक गोमन्तक

टाटा समूहाच्या एअर इंडिया (Air India) आणि Air Asia (AAIPL) च्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. आता या दोन्ही एअरलाइन्स रद्द झाल्या तर प्रवाशांना त्यांचा प्रवास रद्द करावा लागणार नाही.

टाटा समुहाने (Tata Group) म्हटले आहे की, दोन्ही एअरलाइन्सचे कोणतेही फ्लाइट कोणत्याही कारणास्तव निलंबित झाली तर त्यांच्या प्रवाशांना एकमेकांच्या विमानांमध्ये जागा दिली जाईल. एअर इंडिया आणि एअर एशिया इंडिया यांच्यातील परस्पर सहकार्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. यासाठी, दोन्ही विमान कंपन्यांमध्ये इंटरलाइन, कन्सिडरेशन्स ऑन इरॅग्युलर ऑपरेशन्स (IROPs) करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. हा करार 2 वर्षांसाठी म्हणजेच 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू असेल.

टाटा समूहाकडे आता 4 एअरलाईन्स

गेल्या महिन्यात एअर इंडिया आणि एअर एशिया एक्स्प्रेसचा ताबा घेतल्यानंतर टाटा समूहाकडे आता एकूण 4 एअरलाईन्स आहेत. त्याच्याकडे आधीच एअर एशिया इंडिया आणि विस्तारा होत्या. एअर इंडियाचे नवीन व्यवस्थापन कंपनीचे कामकाज, कार्यक्षमता आणि गुणवत्ता सुधारण्यावर भर देत आहे, एअर एशिया इंडियासोबत हा करार करण्यात आला आहे.

7 वर्षांपासून भारतात Air Asiaचे उड्डाण

7 वर्षांहून अधिक काळ भारतात Air Asia व्यवसाय करत आहे, परंतु आजपर्यंत त्यांनी एकही आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाण सुरू केलेले नाही. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टेल्स प्रायव्हेट लिमिटेडने 8 ऑक्टोबर 2021 रोजी कर्जबाजारी एअर इंडियाला 18,000 कोटी रुपयांना विकत घेण्याची बोली जिंकली होती. आता ही कंपनी टाटा समूहात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"प्रामाणिकपणे काम करुनही कोर्टात वारंवार अपमान!", 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणी ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Horoscope 17 June 2026: बुधवारी ग्रहांचा चमत्कार! नशिबाचं चक्र फिरणार; 'या' राशींच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

SCROLL FOR NEXT