सरकारची नवी योजना, लवकरच शेती होणार डिझेलमुक्त

या कारणामुळे भारताचे कृषी क्षेत्र डिझेलपासून मुक्त होईल.
Farmers
Farmers Dainik Gomantak
Published on
Updated on

सर्व काही सुरळीत राहिल्यास येत्या दोन वर्षात भारताचे (India) कृषी क्षेत्र डिझेलमुक्त होईल. केंद्रीय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 2024 पर्यंत देश डिझेल (Diesel) एवजी रिन्युएबल एनर्जीचा 100 % वापर करण्याचे लक्ष्य साध्य करेल. यामुळे भारताचे कृषी क्षेत्र डिझेलपासून मुक्त होईल.

आरके सिंह म्हणाले राज्यांनी निर्धारित लक्ष्य साध्य करण्यासाठी कामाचे नियोजन केले पाहिजे. ते म्हणाले की आम्ही एका नवीन आणि आधुनिक भारतासाठी (India) काम करत आहोत, जे आधुनिक ऊर्जा प्रणालीशिवाय होऊ शकत नाही. हे साध्य करण्यासाठी आम्ही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशासोबत काम करण्यास उत्सुक आहोत.

Farmers
आता क्रिएटर्स YouTube वर सहज पैसे कमवू शकतील, येत आहेत नवीन फीचर्स

भारताचे रिन्युएबल एनर्जी क्षेत्र

एका अहवालानुसार, भारताच्या रिन्युएबल एनर्जी क्षेत्रामध्ये 2030 पर्यंत सुमारे 10 लाख लोकांना रोजगार मिळू शकतो. या क्षेत्रातील बहुतेक नोकऱ्या छोट्या प्रमाणात रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टमधून निर्माण होतील. 2020-21 या आर्थिक वर्षात बहुतेक नवीन कर्मचारी रुफटॉप सोलर श्रेणीत काम करत होते. आर्थिक वर्ष 2019- 20 च्या तुलनेत या क्षेत्राची क्षमता वार्षिक आधारावर नऊ टक्क्यांनी वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com