Ritu Slathia| BlackBird| Online Gaming
Ritu Slathia| BlackBird| Online Gaming  Dainik Gomantak
अर्थविश्व

Success Story: 44 वर्षांच्या काकूंना ऑनलाइन गेमिंगचे वेड, महिन्याला कमावतात लाखो रुपये

Ashutosh Masgaunde

Success Story Of Ritu Slathia Known As BlackBird, Who Earns Lakhs From Online Gaming:

गेल्या काही वर्षांत ऑनलाइन गेमिंग प्रचंड लोकप्रिय झाले आहे. लॉकडाउनपासून यामध्ये अधिक भर पडली आहे. विविध ऑनलाइन गेम्स खेळ खेळणाऱ्या तरुणांमध्ये याची खूप क्रेझ आहे. तो लोकप्रिय आहे.

अशात तुम्हाला भारतात क्वचितच असे कोणीतरी गेमर सापडेल जे चाळीशीत असतील. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा गृहिणीबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन गेमिंगला सुरुवात केली आणि नंतर त्याचे पूर्णवेळ व्यवसायात रूपांतर केले.

कोरोनात साधली संधी

कोरोना काळात लाखो लोकांमध्ये दुःख आणि निराशा पसरली होती. पण काही लोकांसाठी हा काळ अफाट संधीचाही ठरला. यामध्ये रितू स्लाथिया यांचाही समावेश आहे.

जम्मूतील ही गृहिणी कोरोना महामारीच्या काळात एक प्रोफेशनल गेमर बनली आणि आता ती महिन्याला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैस कमवत आहे.

रितू स्लाथिया, ज्यांना गेमिंग कम्युनीटीमध्ये BlackBird म्हणून ओळखले जाते, त्या त्यांच्या गेमप्लेचे व्हिडिओ रूटर या प्रसिद्ध स्ट्रीमिंग आणि गेमिंग प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्ट्रीम करतात.

सध्या, रितू यांचे रूटर गेमिंग प्लॅटफॉर्मवर 3.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अहवालानुसार, त्यांच्या गेमप्लेच्या व्हिडिओंद्वारे, स्लाथिया महिन्याला एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करतात.

यातून मिळणारे पैसे जरी कमी वाटत असले तरी, यातून मला मिळालेले धैर्य आणि आत्मविश्वास अतुलनीय आहे. मला गेमिंग लॉबीमधील वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांशी संवाद साधायला आवडते.
द बेटर इंडियाशी बोलताना, रितू स्लाथिया

मुलगा आणि गेमिंगची आवड

44 वर्षांच्या रितू यांचा मुलगा नेहमी त्याच्या मोबाइलवर गेम खेळण्यात व्यस्त असतो. त्यामुळे रितू यांनाही गेमिंगबद्दल कुतूहल निर्माण झाले, परंतु त्यांच्याकडे मुलाला याबद्दल विचारण्याइतका आत्मविश्वास नव्हता.

2019 मध्ये, त्यांनी अखेर धाडस दाखवले आणि बीजीएमआय (बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया) पासून सुरुवात केली आणि लवकरच गेमिंगमध्ये निपुण झाल्या.

“मला गेम आणि गेमच्या किज् समजायला थोडा वेळ लागला, पण मी पटकन शिकली. त्यानंतर, केवळ कुतूहलामुळेच मी गेमिंग एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. यातून मी मजा करत होतो, बाकी काही नाही,” असे रितू स्लाथिया, सांगतात.

काही काळानंतर, रितू यांना लाइव्ह स्ट्रीमिंग गेमप्ले व्हिडिओंमध्ये रस निर्माण झाला. ऑक्टोबर २०२१ मध्ये, त्यांनी गेमिंग पोर्टलवर पदार्पण केले. त्यानंतर रितू यांनी मागे वळून पाहिले नाही.

रोज चार तास गेमिंग अन् लाखोंची कमाई

दररोज सकाळी, रितू तीन ते चार तास गेमिंगमध्ये घालवतात. पण, यापूर्वी त्या न चूकता त्याचा होमवर्क करतात.

रितू यांना त्यांच्या गेमिंगच्या प्रवासात अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. यांमुळे त्यांना स्वत:मध्ये शंका आणि असुरक्षिततेच्या भावना निर्माण झाल्या. मात्र, त्यांचा मुलगा आणि पतीने त्यांना दिलेल्या पाठींब्यामुळे त्यांना अर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याचे, रितू सांगतात.

म्हणून शिक्षणाला मुकल्या

जम्मूमध्ये वाढलेल्या रितू, मुलगी असल्यामुळे त्यांना बारावीच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. त्यांच्या घरच्यांना रितू यांना कॉलेज किंवा उच्च शिक्षणासाठी पाठवायचे नव्हते त्यामुळे त्यांच्या शिक्षण थांबले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: आक्रमक पवित्र्यामुळे ‘मोपा’वरील टॅक्सी पार्किंग दरवाढ मागे

Venzy Viegas: महिलेला मारहाणीसह मानहानी करणाऱ्या PSI च्या निलंबनाची वेन्झीची मागणी

Koo Shut Down: देसी ट्विटर 'कू' बंद होणार, कंपनीच्या संस्थापकाने लिंक्डइनवर पोस्ट करत दिली माहिती

CRZ Goa: पर्यावरणमंत्र्यांच्‍याच जागेत ‘सीआरझेड’चे उल्‍लंघन करून बांधकाम; करमणेतील स्‍थानिकांचा दावा

Valpoi News: ताडपत्रीच्या आधारावर भरतो बाजार, सर्वत्र खड्डेच खड्डे, रस्त्यांवर सांडपाणी

SCROLL FOR NEXT