Success Story Of Mumbai's Suumit Shah Who Built Dukaan App Worth 500 crores:
सुमित शाह हा 'Dukaan App'चा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्याची कंपनी ही एक DIY (डू इट युवरसेल्फ) प्लॅटफॉर्म आहे.
हे App व्यापाऱ्यांना त्यांचे ई-कॉमर्स स्टोअर अतिशय सोप्या पद्धतीने सेट करण्यास मदत करते. आज लाखो व्यापारी त्याच्याशी जोडले गेले आहेत.
या एका App ने सुमित शाहचे आयुष्य बदलून टाकले आहे.
सुमित शाहने कंपनीचे सह-संस्थापक आणि सीटीओ सुभाष चौधरी यांच्यासमवेत जून 2020 मध्ये 'Dukaan App' लॉन्च केले.
तेव्हापासून लाखो व्यापाऱ्यांनी Dukaan App चा वापर करून ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. अवघ्या 48 तासांत सुरू झालेला हा प्लॅटफॉर्म एका वर्षात 500 कोटींहून अधिक रुपयांचा झाला होता.
सुमित शाहचा जन्म 25 डिसेंबर 1990 मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबात रोजी झाला. सुमितने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.
शालेय शिक्षणानंतर तो महाराष्ट्रातील सातारा येथे आपल्या मामाच्या दुकानात काम करू लागला. त्याने सांगलीतून इंजिनीअरिंग केले.
कॉलेजमध्ये असताना सुमितने रूममेट्सकडून डिजिटल मार्केटिंग, वेब डिझायनिंग आणि डेव्हलपमेंट कोर्सेस शिकला.
मॅकडोनाल्ड्स, क्रेडसह इतर अनेक मोठ्या आणि छोट्या कंपन्यांमध्ये काम केले. त्यानंतर सुमितने 2014 मध्ये त्याचा मित्र सुभाष चौधरीसोबत राईसेमेट्रिक नावाचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आणि इथून त्याच्या यशाचा प्रवास सुरू झाला.
सुमितची २०१४ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून सुभाष चौधरी यांच्याशी भेट झाली होती. सुभाष हे बिहारमधील एका छोट्या शहरातील आहेत.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नोकरीच्या शोधात मुंबईत आले. सुमितला तंत्रज्ञानाची जाण होती. त्यामुळे त्याने कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग कोर्सला प्रवेश घेतला. त्याच्या प्रतिभेला लवकरच न्याय मिळाला. त्याला मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीने नोकरी दिली.
कंप्युटर कोर्सदरम्यान सुमितची सुभाषशी भेट झाली. दोघांचाही डिजिटल मार्केटिंगवर डोळा होता. दोघांनी मिळून राइजमेट्रिक नावाच्या मार्केटिंग एजन्सीसोबत भागीदारी केली.
यशस्वीरित्या एजन्सी चालवल्यानंतर, या दोघांनी मे 2020 मध्ये Dukaan App लॉन्च केले. आणि काही दिवसांतच ते 'यशस्वी स्टार्टअप' बनले.
2020 मध्ये लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते. छोटे किरकोळ विक्रेते व्यवसाय सोडून जाऊ लागले. याच वेळी सुमितला एका रेडिओ जॉकीचा मेसेज आला होता. त्यात 'आम्ही आता WhatsApp वर ऑर्डर स्वीकारतो.'
हा मेसेज पाहूण सुमितला धक्काच बसला. यातून त्याला कल्पना सुचली अन् घरपोच किराणा मालाचे Dukaan App 48 तासांच्या आत तयार केले. आता सुमितच्या या कंपनीची किंमत 500 कोटींपेक्षा अधिक आहे.
Dukaan App व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि तंत्रज्ञानाची कमी जाण असणाऱ्या लोकांना मोबाइलद्वारे त्यांचे स्वतःचे ई-कॉमर्स स्टोअर तयार करण्यास मदत करते.
Dukaan App व्यापाऱ्यांना 30 सेकंदात त्यांचा व्यवसाय सेट करण्यास मदत करते. हे App लॉन्च करण्यामागचा हेतू ऑफलाइन व्यवसायिकांना ऑनलाइन येण्यास मदत करणे हा होता.
Dukaan App लॉन्च झाल्यानंतर 20 दिवसांत, 1.5 लाखांहून अधिक ऑनलाइन स्टोअर्सची आणि 5 लाख उत्पादनांची नोंदणी झाली. तसेच 75 हजारांहून अधिक ऑर्डर्सही मिळाल्या होत्या.
Dukaan App भारतातील लहान व्यवसायांना ऑनलाइन येण्यासाठी आणि खर्या अर्थाने 'डिजिटल इंडिया'च्या कल्पनेला हातभार लावत आहे.
यातून सुमितने भारतातील हजारो छोट्या व्यावसायिकांचे जीवन बदलले आहे. सुमित शाह याची गोष्ट खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
एवढ्या कमी कालावधीत Dukaan App च्या माध्यमातून त्याने ज्या प्रकारचे 'नाव आणि प्रसिद्धी' मिळवली आहे, ती जबरदस्त आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.