Success Story Of Nikhil Kamath And Nitin Kamath Founder Of Online Trading App Zerodha Kite. Dainik Gomantak
अर्थविश्व

Zerodha: नववी पास भावाच्या सोबतीने तरुण झाला हजारो कोटींचा मालक, सर्वात मोठ्या ट्रेडिंग ॲपची इनसाइड स्टोरी

Success Story: निखिल यांना त्यांच्या शाळेने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे त्यांची शाळा तिथेच सुटली. तर नितीन यांनी रात्री कॉल सेंटरमध्ये काम करुन दिवसभर शेअर बाजाराला वेळ देत त्यामध्ये प्राविण्य मिळवले.

Ashutosh Masgaunde

Success Story Of Nikhil Kamath And Nitin Kamath Founder Of Online Trading App Zerodha Kite:

2000 च्या दशकापासून शेअर बाजाराची तेजी गगनाला भिडत आहे. कल्पना करा की एखादा ब्रोकर येतो आणि ट्रेडर्सना अडथळ्याशिवाय ट्रेडिंग करू देतो. होय! 2010 पासून नितिन आणि निखिल कामथ बंधूंनी झिरोधाची स्थापना केली तेव्हापासून शक्य झाले आहे.

बंगळुरू येथे मुख्यालय असलेली, झिरोधा ही एक वित्तीय सेवा कंपनी आहे जी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) मध्ये नोंदणीकृत आहे. आणि शेअर बाजारातील ट्रेडर्सना ब्रोकरेज सुविधा पुरवण्यासाठी तयार केलेली NSE, BSE आणि MCX-SX चे सदस्य आहे.

एकंदरीत, Zerodha ही एक ऑनलाइन डिस्काउंट ब्रोकिंग कंपनी आहे जी त्यांच्या क्लायंट्सना कमी खर्चात सेवा देते.

कोण आहेत निखिल कामथ?

निखिल कामथ यांचा जन्म 5 सप्टेंबर 1987 रोजी झाला. निखिल अभ्यासात फार हुशार नव्हते. प्राथमिक शिक्षण मधेच सोडून त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली.

त्यांच्या अभ्यासाबाबतच्या निष्काळजी वृत्तीचा शाळेतील शिक्षकांना राग होता, त्यामुळे त्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसू देण्यात आले नाही. यानंतर कामत यांनी शाळा सोडली.

कोण आहेत नितीन कामथ?

नितीन कामथ यांनी वयाच्या 17 व्या वर्षी शेअर बाजारात ट्रेडर म्हणून करिअरची सुरुवात केली. नितीन कामत हे कॉलेजला असल्यापासून त्यांचा जास्तीत जास्त वेळ शेअर बाजारात ट्रेडिंगमध्ये घालवायचे. पण 2001 मध्ये बाजारातील मंदीमुळे त्यांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कॉल सेंटरमध्ये काम सुरू केले.

नितीन कामथ रात्री कॉल सेंटरमध्ये काम करायचे, जेणेकरून दिवसभर त्यांना जास्तीत जास्त वेळ शेअर बाजाराला देता येईल.

नितीन कामत यांनी 3 वर्षे कॉल सेंटरमध्ये काम केले, त्यानंतर त्यांच्या ट्रेडिंगमधील सकारात्मक परतावा पाहून ग्राहक त्यांच्याकडे पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचे काम देऊ लागले. त्यांच्याकडे जास्त काम असल्याने नितीन यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आणि हळूहळू, एका क्लायंटच्या रेफरलद्वारे इतर क्लायंट मिळू लागले.

जेव्हा रिलायन्स मनी लाँच करण्यात आले, तेव्हा नितीन कामथ रिलायन्स मनीचे सब ब्रोकर बनले आणि त्यांनी सर्वात यशस्वी सब ब्रोकर म्हणून नाव कमावले.

रिलायन्स मनीसोबत काम केल्यानंतर ट्रेडर्सना येणाऱ्या अडचणी आणि शेअर बाजाराची आवड पाहून त्यांनी आपला धाकटा भाऊ निखिल कामथ यांच्यासह झेरोधा स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

झिरोधाची मुहूर्तमेढ

2010 मध्ये निखिल व त्यांचा भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत झिरोधा ब्रोकरेज कंपनी सुरू केली. झिरोधासोबत त्यांनी गृह, हेज फंड ट्रू बीकन देखील सुरू केले. मनी मॅनेजमेंटसोबत त्यांनी फिनटेक इनक्यूबेटर रेनमॅटर आणि रेनमॅटर फाउंडेशनची स्थापना केली.

झिरोधाने या दोन्ही बंधूंचे नशीब बदलले. निखिल वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी अब्जाधीश झाले. फोर्ब्सनुसार, निखिल कामथ आणि नितीन कामथ यांची संयुक्त संपत्ती सुमारे २८ हजार कोटी इतकी आहे.

झिरोधाचा अर्थ

झिरोधा हा खरे तर इंग्रजी आणि संस्कृत शब्दांपासून बनलेला आहे. झिरो म्हणजे शून्य आणि संस्कृतमध्ये रोधा म्हणजे अडथळा. Zerodha चा अर्थ ‘कोणताही व्यत्यय नाही’, म्हणजे कंपनी एक कोणत्याही अडथळ्याशिवाय ऑनलाइन स्टॉक ब्रोकिंग प्लॅटफॉर्म असल्याचा दावा करते. Zerodha ची टॅगलाइन ‘द फ्री ट्रेड झोन’ आहे.

फोर्ब्स वर्ल्डच्या अब्जाधीशांच्या यादीत स्थान

झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ आणि निखिल कामथ हे अधिकृतपणे 2023 च्या फोर्ब्स वर्ल्डच्या अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. भारतातील सर्वात मोठ्या स्टॉकब्रोकिंग कंपनीचे सीईओ नितीन कामथ 1104 व्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी निखिल कामथ, ज्यांच्याकडे वित्तीय व्यवस्थापन कंपनी ट्रू बीकनचीही मालकी आहे, ते या यादीत 2405 व्या क्रमांकावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa To Indore Flight: खुशखबर! गोवा ते इंदूर विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून सुरू; दिल्लीतून आणखीन 3 विमाने येणार

Anmod Ghat: 'अनमोड'बाबत मोठी अपडेट! महामार्गाच्या विस्ताराला ‘पर्यावरणा’ची स्थगिती; प्रस्तावात त्रुटी असल्याचा दावा

Mapusa Theft: ‘आवाज केला तर ठार मारू’! म्हापशातील चोरीने गोवा हादरला; चोरांनी चहा पिला, फळे खाल्ली, टॅक्सीने गाठले कर्नाटक; वाचा घटनाक्रम..

दुसऱ्या महायुद्धामुळे व्यथित झालेल्या महात्मा गांधींनी हुकूमशहा हिटलरला लिहली होती दोन पत्रं; काय लिहलं होतं पत्रात? वाचा

Battle of Longewala: 1971 चा रणसंग्राम; एका रात्रीत पाकिस्तानच्या 36 रणगाड्यांचा खात्मा! काय आहे 'लोंगेवाला युद्धा'ची कहाणी?

SCROLL FOR NEXT