Success Story Of The 12th failed son of a security guard, Sushil Singh today owns multi-crore companies.
Success Story Of The 12th failed son of a security guard, Sushil Singh today owns multi-crore companies.Dainik Gomantak

सेक्युरिटी गार्डचा 12 वी नापास मुलगा, आज आहे कोट्यावधींच्या कंपन्यांचा मालक

सामान्य पार्श्वभूमी असलेले, सुशीलचे कुटुंब नोकरीच्या शोधात जौनपूर जिल्ह्यातील एका गावातून मुंबईत स्थलांतरित झाले होते. त्याची आई गृहिणी होती. वडील बँकेत सुरक्षा रक्षक होते. डोंबिवलीतील एका चाळीत तो राहत होता.
Published on

Success Story Of The 12th failed son of a security guard, Sushil Singh today owns multi-crore companies:

प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देऊन पुढे कसे जायचे हे ज्यांना माहीत असते, ते जीवनातील कठीण संकटे अली तरी त्या संकटांच्या छाताडावर उभे राहून त्याच्यावर मात करतात.

सुशील सिंग (Sushil Singh) हे देखील असेच एक उदाहरण आहे. आज जग सुशीलला कोट्याधीश टेक्नोप्रेन्योर आणि तीन यशस्वी कंपन्यांचे मालक म्हणून ओळखते. त्यांच्या कंपन्यांमध्ये SSR Techvision, DBACO आणि Cyva Systems Inc यांचा समावेश आहे.

वडील बँकेत सुरक्षा रक्षक

सुशील सिंगने (Sushil Singh) 11,000 रुपये मासिक पगारावर आपल्या करिअरची सुरुवात केली. आज त्याची कमाई करोडोंमध्ये आहे. टेक्नोप्रेन्योर म्हणून त्याने आपला ठसा उमटवला आहे.

तो सध्या तीन कंन्यांचा आणि एका एनजीओचा संस्थापक आहे. नम्र पार्श्वभूमीतून आलेले, सुशीलचे कुटुंब नोकरीच्या शोधात जौनपूर जिल्ह्यातील एका गावातून मुंबईत आले होते. त्याची आई गृहिणी होती. वडील बँकेत सुरक्षा रक्षक होते. डोंबिवलीतील कॉलनीत एका चाळीत त्याचे बालपण गेले.

बालपण आर्थिक संकटात गेले

सुशीलने (Sushil Singh) दहावीपर्यंतचे शिक्षण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेत पूर्ण केले. ही शाळा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांसाठी चालवली जाते, जिथे हिंदी माध्यमात शिक्षण दिले जाते.

दहावीपर्यंत सुशीलला शाळेत खूप मजा यायची. यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. त्याचे मन अभ्यासातून विचलित होऊ लागले. सुशील बारावीत नापास झाला होता. पण, पुढच्याच वर्षी त्याने बारावीची परीक्षा दिली आणि पास झाला.

शालेय शिक्षणानंतर सुशीलने अलाहाबाद विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला. त्याचा आवडीचा विषय शिकण्यात त्याला मजा येत होती. पण, त्याचे प्राध्यापक त्याला जे शिकवत होते त्याबद्दल तो समाधानी नव्हाता.

2003 मध्ये त्याने दुसऱ्या वर्षात कॉलेज सोडले. 2015 मध्ये पॉलिटेक्निक कोर्स पूर्ण केल्यानंतर, सुशीलने एका कंपनीत एंट्री-लेव्हल टेलिकॉलर आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यावेळी त्याला महिन्याला 11 हजार रुपये पगार मिळत असे.

Success Story Of The 12th failed son of a security guard, Sushil Singh today owns multi-crore companies.
Success Story: 44 वर्षांच्या काकूंना ऑनलाइन गेमिंगचे वेड, महिन्याला कमावतात लाखो रुपये

... आणि यशाचा मार्ग सापडला

नोव्हेंबर 2013 मध्ये सुशीलची (Sushil Singh) सरिता रावत सिंहसोबत पहिली भेट झाली. त्यावेळी ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती.

पुढे दोघांनी लग्न केले. दोन वर्षांत दोघांनी नोएडामध्ये यूएसस्थित एका कंपनीच्या सहकार्याने बीपीओ सुरू केला. येथूनच SSR Techvision अस्तित्वात आले. या कंपनीबरोबर केवळ तीन ते चार महिने काम केल्यानंतर, त्याला नोएडामध्ये सरकारी जागा मिळाली.

Success Story Of The 12th failed son of a security guard, Sushil Singh today owns multi-crore companies.
Success Story: 48 तसांत उभारली 500 कोटींची कंपनी! गोष्ट मुंबईच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील सुमितची

यशाचा आलेख उंचावला

सुशीलने 2.5 वर्षांनंतर नोएडातील संपूर्ण इमारत विकत घेण्याचे ठरवले. त्याचा दुसरा व्यवसाय डीबॅको होता. हे जागतिक B2C ऑनलाइन कपड्यांचे दुकान आहे. मात्र, ती प्रामुख्याने सरिताच सांभाळते.

अलीकडेच त्यांनी त्यांचा तिसरा व्यवसाय, Cyva Systems Inc लाँच केली. सुशीलने 2019 मध्ये याची सुरुवात केली. ही एक बहुराष्ट्रीय आयटी सल्लागार कंपनी आहे. ही कंपनी इतर कंपन्यांना त्यांच्या गरजेनुसार सर्वोत्तम उमेदवार शोधण्यात मदत करते.

सुशील (Sushil Singh) सध्या तीन कंपन्यांच्या माध्यमांतून महिन्याला करोडो रुपये कमावतो. त्याच्या या यशाने प्रत्येक मध्यमवर्गीय मुलाला कष्ट करण्याची प्रेरणा दिली आहे. आणि दाखवून दिले आहे की, जर कष्ट केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com