Success story of Kalpana Saroj Dainik Gomantak
अर्थविश्व

Kalpana Saroj: छळ, उपेक्षा अन् दारिद्र्याच्या छाताडावर उभारत वाघिणीने निर्माण केले हजारो कोटींचे साम्राज्य

Kalpana Saroj: अंगावर जखमा झाल्या होत्या आणि जगण्याची ताकद संपली होती. एक दिवस या नरकातून पळून गेलेल्या कल्पना यांच्यासोबतच त्यांच्या घरच्यांनाही गावातील पंचायतीने वाळीत टाकले.

Ashutosh Masgaunde

Success story of Kalpana Saroj Who Built Companies Worth More Than Thousand Crores: ही गोष्ट आहे एका जिद्दी स्त्रीची जिने नियतीलाही पराभवाची धूळ चारली. जिला जन्मापासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

समाजाकडून उपेक्षा सहन करावी लागली, लहानपणीच वडिलांनी तिचे लग्न लावून दिले आणि सासरच्या घरात तिचा छळ सुरू झाला.

आयुष्याला कंटाळलेल्या कल्पना यांनी कित्येकवेळा आत्महत्येचाही प्रयत्न केला. पण या सर्वातून सावरत तिने रोज दोन रुपये मजुरीवर काम केले. पण जिद्द आणि चिकाटी कायम ठेवत त्यांनी आज सुमारे एक हजारा कोटींच्या कंपन्यांचे साम्राज्य उभारले.

दुष्काळातून मुंबईच्या झोपडपट्टीत

दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील 'विदर्भात' कल्पना यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बिकट असल्याने कल्पना शेणाच्या गोवऱ्या बनवून विकायच्या. वयाच्या 12 व्या वर्षी कल्पना यांचा विवाह त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी झाला.

आणि त्या विदर्भातून मुंबईच्या झोपडपट्टीत पोहोचल्या. त्याचे शिक्षण थांबले. घरातील कामात किरकोळ चूक झाली की कल्पना यांना सासरच्या लोकांकडून रोज मारहाण व्हायची

अंगावर जखमा झाल्या होत्या आणि जगण्याची ताकद संपली होती. एक दिवस या नरकातून पळून गेल्या आणि पुन्हा आपल्या आई-वडिलांचे घर गाठले.

आणि याची शिक्षा कल्पना यांच्यासोबतच त्यांच्या घरच्यांनाही सासरच्या घर सोडण्याची शिक्षा देण्यात आली. गावातील पंचायतीने त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. यातून कल्पना यांना जीवनाचे सर्व मार्ग बंद झाल्याचे दिसू लागले.

50 हजारांच्या कर्जाने सुरू झाला प्रवास...

कल्पना यांनी दलितांसाठी असलेल्या सरकारी योजनेतून 50 हजारांचे कर्ज घेऊन आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली. या कर्जातून एक शिलाई मशीन आणि इतर काही वस्तू खरेदी केल्या आणि बुटीक शॉप सुरू केले.

बुटीकचे दुकान रात्रंदिवस चालवत कल्पना यांना त्यांच्या कुटुंबीयांनाही पैसे पाठवायला लागायचे. 22 वर्षांच्या झाल्यानंतर त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला. यानंतर कल्पनाने स्टील फर्निचरच्या व्यावसायिकाशी लग्न केले, परंतु 1989 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. आणि पुन्हा एकट्या पडल्या.

यशाकडे कूच

कल्पना यांनी काहीही झाले तरी आपल्या आयुष्यातून गरिबी हटवण्याचे व्रत घेतले. रोज चार ब्लाउज शिवले तर 40 रुपये मिळतील आणि घरच्यांनाही हातभार लागेल, असा विचार त्यांनी केली.

आणि कठोर परिश्रम सुरू केले. दिवसाचे 16-16 तास काम केले, यातून त्यांनी पैसेही कमवले आणि कुटुंबाला आधारही दिला.

बंद पडलेल्या कंपनीला सुगीचे दिवस

2000 च्या दशकात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत 17 वर्षांपासून बंद असलेली 'कमानी ट्युब्स' नावाची कंपनी मालकांच्या हातातून काढून घेतली आणि कामगारांना ती चालवायला दिली.

सर्व कामगारांनी कल्पना यांना मदत मागितली आणि कल्पना यांनी कंपनीला सर्व कर्ज आणि वादातून मुक्त केले. यानंतर कंपनीची कमान 2006 मध्ये कल्पना यांच्या हाती आली.

असे उभे राहिले साम्राज्य

कल्पाना यांनी शिलाई व्यवसायात जम बसवला आणि व्यवसाय एका नव्या उंचीवर नेला. या व्यवसायातून मिळणारा नफा त्यांनी फर्निचरच्या व्यवसायात गुंतवला आणि नंतर फिल्म प्रॉडक्शन हाऊस सुरू केले.

केएस फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला पहिला चित्रपट 3 भाषांमध्ये प्रदर्शीत झाला. 1985 मध्ये कमानी ट्युब्स कंपनीत कल्पना यांचे नुकसान झाले. कमानी ट्युब्स ही स्टील पाईप बनवणारी कंपनी आहे. पण त्यांनी हार न मानता यातून भरारी घेतली.

आज कल्पना आज 900 कोटींच्या कंपन्यांच्या मालकीण आहेत. त्या कमानी ट्युब्स या करोडोंची उलाढाल असलेल्या कंपनीच्या अध्यक्षा आहेत. याशिवाय कल्पना सरोज कमानी स्टील्स, केएस क्रिएशन्स, कल्पना बिल्डर अँड डेव्हलपर्स, केएस फिल्म्स, कल्पना असोसिएट्स आणि कमानी ट्युब्स अशा 6 कंपन्यांच्या मालकीण आहेत.

पद्मश्रीच्या मानकरी

कल्पना यांनी त्यांच्या व्यवसायासोबतच अनेक सामाजिक कामेही केली आहेत. ज्यासाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कल्पना यांनी प्रामुख्याने महिलांचे सक्षमीकरण, शिक्षणाचा प्रसार, जाती-आधारित भेदभावासारख्या गोष्टीचे निर्मुलन करण्यासाठी काम केले आहे. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना भारतातील सर्वात मोठा नागरी पुरस्कार पद्मश्रीनेही सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT