Goa Cable Issue: ..अखेर मार्ग मोकळा! वीज खांबांवरील केबल्स कापल्या जाणार; गोवा खंडपीठाचा स्थगितीस नकार
पणजी: वीज खात्याने पुन्हा सुरू केलेल्या वीज खांबांवरील केबल्स कापणी मोहिमेस स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नकार दिला आहे. यामुळे ही मोहीम सुरू ठेवण्याचा वीज खात्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुमारे वर्षभराने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. त्याला सांताक्रुझमध्ये झालेला अपघात कारणीभूत ठरला आहे. सांताक्रुझ येथे खांबाला लटकत असलेल्या केबलमुळे अपघात झाल्यानंतर वीज विभागाने पुन्हा वीज खांबांवर असलेले केबल कापण्याची मोहीम सुरू केली. यामुळे होत असलेले नुकसान थांबविण्यासाठी केबल ऑपरेटरने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत अंतरिम स्थगिती मागितली होती. मात्र, न्यायालयाने ती नाकारली.
अपघातग्रस्ताला मिळणार मदत
न्यायालयाने अहवाल पाहिल्यानंतर अपघातग्रस्ताला कोणती व किती मदत द्यायची, याबाबतचा निर्णय न्यायालय पुढील सुनावणीत न्यायालय घेणार आहे. ज्याच्या केबलमुळे अपघात झाला, तो ऑपरेटर स्वतःचा केबल ओळखतो की नाही, हेही समोर येईल. त्यानंतर न्यायालय त्यांच्या जबाबदारीबाबत निर्णय घेईल, असे शेट्ये यांनी सांगितले.
...तर केबल्स कापणार नाही
शेट्ये यांनी सांगितले की, याचिकाकर्त्याने केबल कापण्यास अंतरिम स्थगिती मागितली होती. मात्र, न्यायालयाने ती नाकारली. धोकादायक किंवा चुकीच्या पद्धतीने लटकवलेल्या केबलमुळे अपघात झाला तर पूर्ण जबाबदारी केबल ऑपरेटरचीच राहील आणि खांबांचे नुकसान किंवा ओव्हरलोडिंगमुळे होणाऱ्या दुर्घटनांचीही जबाबदारी ऑपरेटर्सनी लेखी स्वरूपात स्वीकारावी. जर ते जबाबदारी घेत असतील तर केबल कापणार नाही, असेही शेट्ये त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

