Success Story of Founder of brokerage app Groww Lalit Keshre. Dainik Gomantak
अर्थविश्व

Groww: नोकरी सोडून सुरू केलेल्या स्टार्टअपचा शेअर मार्केट विश्वात धुमाकूळ, शेतकऱ्याच्या पोराची 7 वर्षात 250 कोटी कमाई

Success Story: मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनीही यात गुंतवणूक केली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ललितची एकूण संपत्ती आज २४७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी अजूनही सातत्याने वाढत आहे.

Ashutosh Masgaunde

Success Story of Founder of brokerage app Groww Lalit Keshre:

जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थेसोबतच स्टार्टअपच्या बाबतीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. स्टार्टअपची संख्यांही देशात झपाट्याने वाढली आहे.

आज आपण अशाच एका स्टार्टअपबद्दल बोलणार आहोत, जे मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याच्या मुलाने सुरू केले होते आणि आज त्याने एक वेगळी उंची गाठली आहे.

खूप कमी वेळात हे यश मिळवण्यासाठी त्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने हे शक्य केले आहे. हे स्टार्टअप आहे Groww, या ब्रोकिंग फर्मने आता Zerodha मागे टाकले आहे.

ललित केशरेने आधीही एक स्टार्टअप सुरू केले होते, पण काही कारणांमुळे ते जास्त काळ चालू शकले नाही. यानंतर, त्याने आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा स्टार्टअप सुरू केले आणि यावेळी तो यशस्वी झाला.

कोण आहे ललित केशरे?

ललित केशरेचा जन्म 1983 मध्ये मध्य प्रदेशातील खरगोन येथील शेतकरी कुटुंबात झाला. शेतकरी असूनही त्याच्या वडिलांनी शिक्षणाचे महत्त्व समजून ललितला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले.

ललितचे शालेय शिक्षण खरगोनमध्येच झाले. बारावीनंतर त्याने आयआयटीची प्रवेश परीक्षा दिली आणि चांगल्या रँकने त्याने आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश मिळवला.

इंजिनिअरिंगनंतर फ्लिपकार्टमध्ये नोकरी

आयआयटी बॉम्बेमधून अभियांत्रिकी केल्यानंतर ललितने अनेक कंपन्यांमध्ये काम केले, त्यात फ्लिपकार्ट हे प्रमुख नाव आहे. त्याने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टमध्ये 2016 पर्यंत काम केले, जिथे तो प्रोजेक्ट मॅनेजरच्या पदावर फ्लिपकार्ट मार्केटप्लेसचे काम पाहत होता. येथेच तो Groww च्या भावी सह-संस्थापकांना भेटला.

अशी झाली Groww ची सुरुवात

फ्लिपकार्टवर काम करत असताना ललितची हर्ष जैन, नीरज सिंग आणि ईशान बन्सल यांची भेट झाली. ललितसोबतच या तिन्ही तरुणांचीही उद्योजकीय मानसिकता होती.

2016 मध्ये, या सर्वांनी फ्लिपकार्टमधील नोकऱ्या सोडल्या आणि बंगळुरूमध्ये Groww सुरू केले. सुरुवातीच्या काळात त्यांना यशस्वी होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण हळूहळू कंपनी यशस्वी होऊ लागली.

आणि यूजर्सची संख्या वाढत गेली

Groww मधील सक्रिय यूजर्सच्या संख्येत वर्षानुवर्षे लक्षणीय वाढ झाली आहे आणि गेल्या काही महिन्यांत ही गती आणखी वाढली आहे.

शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) च्या डेटावर नजर टाकली तर, आर्थिक वर्ष 2021 मध्ये Groww सक्रिय यूजर्सची संख्या केवळ 7.8 लाख होती, जी पुढील काळात 38.5 लाख झाली.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये ती 53.7 लाख झाली. सप्टेंबर २०२३ पर्यंत, हा आकडा ६६.३ लाखांच्या पातळीवर पोहोचला आणि झिरोधाच्या ६४.८ लाख वापरकर्त्यांना मागे टाकले.

अशा प्रकारे Groww ला यश

Groww चे स्वतःचे अ‍ॅप आहे, जे स्टॉक ब्रोकिंगमधील लोकांना नाममात्र कमिशनवर स्टॉक मार्केट संबंधित सुविधा पुरवते. एका मुलाखतीत ललितने सांगितले आहे की, Groww ला सर्वाधिक प्रसिद्धी माउथ पब्लिसीटीमुळे मिळाली.

आज, सक्रिय यूजर्सच्या संख्येच्या बाबतीत Groww हे भारतातील सर्वात मोठे स्टॉक मार्केट अ‍ॅप बनले आहे.

स्टॉक मार्केट सेवांच्या बदल्यात ते नाममात्र कमिशन आकारते, ज्यामुळे ते लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनीही यात गुंतवणूक केली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ललितची एकूण संपत्ती आज २४७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी अजूनही सातत्याने वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

SCROLL FOR NEXT