राहिले फक्त 7 दिवस! Aadhaar Card वरील नाव, जन्मतारीख, पत्ता मोफत बदलण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Aadhaar Update: गेल्या काही महिन्यांपासून आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा मोफत उपलब्ध असून, त्याचा लाभ आता काही दिवसांसाठीच घेता येणार आहे.
Aadhaar card
Aadhaar card Dainik Gomantak
Published on
Updated on

Follow these steps to change name, date of birth, address on Aadhaar Card for free:

आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. ज्यामध्ये तुम्ही पुढील ७ दिवसांत नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी मोफत अपडेट करू शकता.

गेल्या काही महिन्यांपासून आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा मोफत उपलब्ध असून, त्याचा लाभ आता काही दिवसांसाठीच घेता येणार आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) देशातील नागरिकांना आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत देत आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करून आधार कार्डमधील माहिती अपडेट करू शकता.

MyAadhaar पोर्टलवर आधार अपडेट मोफत

डिजिटल इंडिया प्रकल्पाचा भाग म्हणून सुरू केलेल्या myAadhaar पोर्टलवर तुम्ही आधार कार्डमध्ये नाव, पत्ता आणि जन्मतारीख मोफत अपडेट करू शकता.

याबाबतची माहिती UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटर म्हणजेच X खात्यावर अनेक वेळा ट्वीटद्वारे दिली आहे.

Aadhaar card
10 लाखांचा दंड, तुरुंगवास आणि 90 दिवसांची मर्यादा... Sim Card खरेदी-विक्री करताना आता घ्यावी लागणार काळजी

अशी बदला आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख मोफत

  • सर्व प्रथम, https://myaadhaar.uidai.gov.in वर जा आणि लॉग इन करा.

  • यानंतर Document Update या पर्यायावर जा.

  • तपशील पाहिल्यानंतर, पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.

  • आता हायपर-लिंकवर क्लिक केल्यानंतर ड्रॉपडाउन सूचीवर जा.

  • येथे “प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ अॅड्रेस डॉक्युमेंट” असा पर्याय असेल, तो निवडा.

  • यानंतर तुम्ही पुढे प्रक्रियेसाठी इतर पर्याय निवडू शकता.

Aadhaar card
भारतातील Smartphone ला पहिल्यांदाच मिळणार 'असे' फिचर, iQOO 12 च्या प्री-बुकिंगसाठी ग्राहकांच्या उड्या

आपण 14 डिसेंबर 2023 पर्यंत आधार कार्ड विनामूल्य नाव, पत्ता आणि जन्म तारीख अपडेट करू शकता. यानंतर तुमची प्रोसेसिंग फीस म्हणून 50 रुपये भरावे लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com