Adani Stock News: हिंडेनबर्गचा अंदाज खरा ठरला! अदानी ग्रुपचे 3 स्टॉक आले 'या' किंमतीवर...

85 टक्के ओव्हरव्हॅल्युड असल्याचा रीपोर्टमध्ये केला होता दावा, एक महिन्यात 85 टक्क्यांनी घसरण
Adani Group Stock Crash
Adani Group Stock CrashDainik Gomantak
Published on
Updated on

Adani Stock News: अमेरिकेतील हिंडेनबर्ग रीसर्च या संस्थेने भारतातील अदानी समुहाबाबत 24 जानेवारीला एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात अदानी समुहातील काही शेअर्स हे सुमारे 85% ओव्हरव्हॅल्युड आहेत, असे म्हटले होते.

हा रीपोर्ट प्रसिद्ध होऊन आता एक महिना होत आला असून अदानी समुहातील तीन स्टॉक्स आजघडीला 85% टक्के घसरणीसह ट्रेड करत आहेत.

Adani Group Stock Crash
Vaishno Devi: वैष्णोदेवीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर, रेल्वेने सुरु केली नवी सुविधा; आता फक्त...

अदानी टोटल गॅस हा स्टॉक बुधवारी बीएसईवर 835 रुपयांवर बंद झाला, 24 जानेवारीच्या बंदच्या तुलनेत तो सुमारे 79 % खाली आला आहे. याशिवाय अदानी ग्रुपचे आणखी दोन स्टॉक्स गेल्या 52-आठवड्यांच्या निच्चांकी घसरणीचा विचार करता सुमारे 85 टक्के घसरणीच्या जवळ आहेत. ते स्टॉक्स आहेत अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशन.

25 जानेवारीपासून अदानी समूहाच्या 10 कंपन्यांच्या समभागांच्या किमती खाली जात आहेत. अदानी टोटल गॅस हा शेअर 25 जानेवारीनंतर गेल्या 20 सत्रांमध्ये लोअर सर्किटवर बंद झाला आहे. अदानी टोटल गॅस या शेअरचे बाजार मूल्य 3.35 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे.

4.3 लाख कोटी रुपयांवरून या शेअरची मार्केट कॅप आता 1 लाख कोटी रुपयांच्या खाली 91,829 कोटी रुपयांवर आली आहे. अदानी ग्रीन एनर्जी हा स्टॉक आता त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी 3,048 रुपयांवरून 82% खाली बुधवारी 539 रूपयांवर ट्रेड करत होता.

Adani Group Stock Crash
Bank Holidays March 2023: मार्चमध्ये 12 दिवस राहणार बँका बंद, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

ओरिएंट सिमेंटसोबतचा करार रद्द

बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, ओरिएंट सिमेंट या सीके बिर्ला ग्रुपच्या कंपनीने अदानी पॉवर महाराष्ट्रसोबतचा करार रद्द केला आहे. अदानी समूहासोबतचा करार मोडीत काढताना, सीके बिर्ला समूहाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की अदानी समूह या करारासाठी आवश्यक मंजुरी मिळवण्यात अपयशी ठरला आहे.

ओरिएंट सिमेंटने सप्टेंबर 2021 मध्ये अदानीसोबत सामंजस्य कराराची घोषणा केली होती. दोन्ही कंपन्यांनी महाराष्ट्रातील तिरोडा येथे सिमेंट ग्राइंडिंग युनिट उभारण्यासाठी करार केला होता. सीके बिर्ला ग्रुपच्या म्हणण्यानुसार, या सामंजस्य कराराची टाइमलाइन आता संपली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com