मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी अवघ्या दोन दिवसात विकले आपले निम्मे शेअर

2014 मध्ये सीईओ झाल्यानंतर सत्या नडेला यांची ही सर्वात मोठी शेअर विक्री आहे
Microsoft CEO Satya Nadella cells 50 percent  shares from company
Microsoft CEO Satya Nadella cells 50 percent shares from company Dainik Gomantak

मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नडेला (Satya Nadella) यांनी आपले कंपनीतील निम्मे शेअर्स (Shares) विकले आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात अवघ्या दोन दिवसांत त्यांच्या शेअर्सचे व्यवहार केले आहेत. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, फेडरल सिक्युरिटीजमध्ये केलेल्या फाइलिंगमधून ही माहिती समोर आली आहे.(Microsoft CEO Satya Nadella cells 50 percent shares from company)

यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनमध्ये दाखल केलेल्या माहितीनुसार, रेडमंड टेक जायंटने अहवाल दिला की मायक्रोसॉफ्ट कॉर्पचे सीईओ सत्या नडेला यांनी गेल्या आठवड्यात केवळ दोन दिवसांत कंपनीतील 838,584 शेअर्स विकले. या व्यवहारातून नडेला यांना 285 दशलक्ष डॉलर्स मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे. शेअर्सची ही मोठी डील 22 आणि 23 नोव्हेंबरला झाली आहे.

मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने या संदर्भात एक लेखी निवेदन जारी करून म्हटले आहे की, नाडेला यांनी वैयक्तिक आर्थिक नियोजन आणि विविधीकरणाच्या कारणांसाठी मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समधील अर्धा हिस्सा विकला आहे. प्रवक्त्याच्या मते, नडेला कंपनीच्या निरंतर यशासाठी वचनबद्ध आहेत आणि त्यांची होल्डिंग मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे.

Microsoft CEO Satya Nadella cells 50 percent  shares from company
आता IPO मध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पैसे गुंतवणे होणार शक्य

2014 मध्ये सीईओ झाल्यानंतर सत्या नडेला यांची ही सर्वात मोठी शेअर विक्री आहे. विशेष म्हणजे, भारतीय वंशाचे सीईओ नडेला मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्यानंतर या कंपनीची झपाट्याने वाढ झाली आहे आणि ती जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक बनली आहे. अहवालानुसार, कंपनीचे सध्या बाजार भांडवल 2.53 ट्रिलियन डॉलर इतकी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com