Mukesh Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

श्रीलंकेची सरकारी कंपनी मुकेश अंबानींच्या रडारवर, खरेदीच्या शर्यतीत 'यांच्याशी' स्पर्धा

Mukesh Ambani: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंका सरकारला निधी उभारण्यासाठी आपल्या अर्थव्यवस्थेतील अनेक क्षेत्रांचे खाजगीकरण करायचे आहे.

Ashutosh Masgaunde

Sri Lankan state-owned company on Mukesh Ambani's radar, competing with 'these' companies in buyout race:

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आपला व्यवसाय सतत विस्तारत आहेत आणि त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज एकामागून एक सौदे करत आहे. आता मुकेश अंबानींचे लक्ष श्रीलंकेच्या एका सरकारी कंपनीवर आहे, ज्यामध्ये रिलायन्सची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने हिस्सा खरेदी करण्यात रस दाखवला आहे. मात्र, या शर्यतीत आणखी दोन मोठ्या कंपन्या सामील असल्याचे सांगण्यात येत आहे.

बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंका सरकारला निधी उभारण्यासाठी आपल्या अर्थव्यवस्थेतील अनेक क्षेत्रांचे खाजगीकरण करायचे आहे.

यासाठी, श्रीलंकेने सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी PLC साठी गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर 2023 पासून संभाव्य गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव आमंत्रित केले होते. 12 जानेवारीच्या अंतिम मुदतीनंतर, आता श्रीलंका सरकारने एक प्रकाशन जारी केले आहे आणि त्याबद्दल अपडेट शेअर केले आहेत.

श्रीलंकन ​​टेलिकॉम कंपनी पीएलसीमध्ये सरकारचा 49.5 टक्के हिस्सा आहे, तर अ‍ॅमस्टरडॅमस्थित ग्लोबल टेलिकम्युनिकेशन होल्डिंग्सचा 44.9 टक्के हिस्सा आहे. आता सरकार हा हिस्सा विकणार आहे.

अहवालानुसार, प्रस्ताव मागवण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर, असे सांगण्यात आले आहे की रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त, गोर्ट्यून इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेड आणि पेटीगो कॉमर्सिओ इंटरनॅशनल एलडीए यांनी देखील ते खरेदी करण्यासाठी अर्ज केले आहेत.

आघाडीची ब्रोकरेज फर्म BOFA ने मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जिओचे मूल्य 107 अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच, ब्रोकरेज फर्मने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, Jio Platforms या वर्षी त्याच्या अपग्रेड केलेल्या फीचर फोन JioBharat आणि वायरलेस ब्रॉडबँड डिव्हाइस JioAirFiber सह नवीन सदस्य जोडणे सुरू ठेवेल.

उल्लेखनीय आहे की, मुकेश अंबानी नुकतेच पुन्हा एकदा १०० अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, मुकेश अंबानी जगातील सर्वोच्च अब्जाधीशांच्या यादीत 12 व्या स्थानावर पोहोचले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

SCROLL FOR NEXT