Gold-Silver Price
Gold-Silver Price  Dainik Gomantak
अर्थविश्व

चांदीने मे महिन्यात केला मोठा रेकॉर्ड, गुंतवणूकदार ‘मालामाल’; सेन्सेक्स, सोने अन् बिटकॉइनलाही सोडले मागे

Manish Jadhav

International Market: आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या चांदीचे दर सातत्याने विक्रम मोडत आहेत. किंमती $32 प्रति औंस ओलांडल्या आहेत. दुसरीकडे, देशात मतदानामुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यानंतरही चांदीच्या वाढत्या दरामुळे गुंतवणूकदारांचे ‘चांदी’ झाले आहे. सोने असो वा सेन्सेक्स, निफ्टी आणि बिटकॉइनही चांदीच्या तुलनेत कमाईच्या बाबतीत मागे पडले आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज शेवटच्या वेळी 17 मे रोजी उघडण्यात आले. त्या दिवशी चांदीच्या भावाने प्रथमच 92 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आणि उच्चांकाचा रेकॉर्ड नोंदवला. सोमवारी बाजार उघडला असता तर 94 हजार ते 95 हजार रुपये प्रतिकिलो दर मिळाले असता. मे महिन्यात चांदीने गुंतवणूकदारांना (Investors) किती परतावा दिला हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याउलट गुंतवणूकदारांनी सोने, निफ्टी, सेन्सेक्स आणि बिटकॉइनमधून किती पैसे कमावले हेही सांगणार आहोत...

मे महिन्यात चांदीने मोठी वाढ नोंदवली

दरम्यान, मे महिन्यात चांदीने गुंतवणूकदारांना तगडा नफा कमावून दिला. गेल्या महिन्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच 30 एप्रिल रोजी MCX वर चांदीची किंमत 80,851 रुपये प्रति किलो होती. तर 17 मे रोजी चांदीचा भाव 91,024 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. म्हणजेच मे महिन्यात चांदीच्या (Silver) किमतीत प्रति किलो तब्बल 10,173 रुपयांची वाढ झाली. म्हणजेच चांदीने गुंतवणूकदारांना 12.58 टक्के परतावा दिला आहे.

सोन्याने किती परतावा दिला?

मे महिन्यात चांदीच्या दरात जेवढी तेजी पाहायला मिळाली होती, तेवढी तेजी सोन्याच्या दरात पाहायला मिळाली नाही. गेल्या महिन्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच 30 एप्रिल रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 70,415 रुपये होता. जो 17 मे रोजी वाढून 73,711 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. म्हणजेच मे महिन्यात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 3,296 रुपयांची वाढ नोंदवली होती. जर गुंतवणूकदारांना मिळालेल्या परताव्याबद्दल बोलायचे झाल्यास मे महिन्यात सोन्याने 4.68 टक्के परतावा दिला.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा मुख्य निर्देशांक निफ्टीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. जर आकड्यांनुसार बोलायचे झाल्यास, 30 एप्रिल रोजी निफ्टी 22,604.85 अंकांवर बंद झाला. शनिवारी 18 मे रोजी स्पेशल ट्रेडिंग झाला आणि निफ्टीचा आकडा 22,502 अंकांवर पोहोचला. याचा अर्थ मे महिन्यात निफ्टीने गुंतवणूकदारांचे 0.45 टक्के नुकसान केले आहे.

दुसरीकडे, मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सचा गुंतवणूकदारांना फायदा झालेला नाही. 30 एप्रिल रोजी सेन्सेक्स 74,482.78 अंकांवर बंद झाला होता. 18 मे रोजी स्पेशल ट्रेडिंग बंद झाल्यानंतर सेन्सेक्स 74,005.94 अंकांवर दिसून आला. म्हणजेच या कालावधीत 476.84 अंकांची घसरण झाली. मे महिन्यात सेन्सेक्समधून गुंतवणूकदारांना 0.64 टक्क्यांनी तोटा सहन करावा लागला.

अशाप्रकारे बिटकॉइनने दिलासा दिला

दुसरीकडे, बिटकॉइनने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. पण कमाईच्या बाबतीत ते चांदीच्या मागे पडले आहे. जर आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, 30 एप्रिल रोजी भारतात बिटकॉइनची किंमत 50,80,138 रुपये होती. तर 19 एप्रिल रोजी किंमत वाढून 55,24,812 रुपये झाली. या काळात बिटकॉइनच्या किमतीत 4,44,674 रुपयांची वाढ झाली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 8.75 टक्के कमाई केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: धावे सत्तरीत विहीरीत बुडून एकाचा मृत्यू!

NEET Exam: गोव्यातील चार हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्याची NSUI ची मागणी

Mining Transport: खनिज वाहतूकप्रश्‍नी सरकारला कानपिचक्या! कोर्टाने केल्या महत्वाच्या सूचना

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT