Multibagger Stock:शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे संयम बाळगणे आवश्यक आहे. जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये हुशारीने गुंतवणूक केली असेल, आणि अशा परिस्थितीत जर किंमत वाढली किंवा कमी झाली तर जास्त काळजी करू नये. कारण काही वेळ जर प्रतीक्षा केली तर चांगला परतावा मिळाल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. नेविन फ्लोरिनच्या (Navin Fluorine) शेअरसह (Share), कंपनीच्या शेअरची किंमत गेल्या आठ वर्षांत NSE वर रु. 55.26 (24 जानेवारी 2014) वरून रु. 3,803 प्रति शेअर झाली आहे. म्हणजेच या कालावधीत किमतीत सुमारे 6800 टक्क्यांची उसळी दिसून आली.
कंपनीच्या स्टॉकचा इतिहास काय आहे
गेल्या काही सत्रांमध्ये हा शेअर फायदेशीर ठरलेला नाही. एका महिन्यात शेअरची किंमत 4245 रुपये प्रति शेअरवरून 3803 रुपये प्रति शेअर झाली. मात्र आपण गेल्या 6 महिन्या आधिचा विचार केला तर, शेअरची किंमत ही 3681.25 रुपयांवरून 3803 रुपये (25 जानेवारी 2022) पर्यंत वाढली आहे. म्हणजेच, सुमारे 3% ने शेअर वधारला आहे. जर एखाद्या शेअर धारकाने एक वर्षापूर्वी या कंपनीवर विश्वास ठेवला असता तर, आज त्याचा परतावा 55% नी वाढला असता.
गेल्या 5 वर्षांचा विचार केला तर, शेअरची किंमत ही 540 रुपयांवरून 3803 रुपये प्रति शेअर झाली आहे. या कालावधीत सुमारे 600 टक्क्यांनी वधारला आहे. त्याच वेळी, 8 वर्षांपूर्वी या कंपनीच्या(Company) एका शेअरची किंमत केवळ 55.26 रुपये होती. म्हणजेच आठ वर्षांपूर्वी ज्या शेअर धारकाने गुंतवणूक केली असेल, तर तो आज श्रीमंत असेल.
एक लाखाच्या गुंतवणुकीचे काय झाले?
जर एखाद्याने महिनाभरापूर्वी नविन फ्लोरिनच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ते 90 हजारांवर आले असते. तर 6 महिन्यांपूर्वी केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज 1.03 लाख रुपये झाली असती. शेअर धारकाने वर्षभरापूर्वी विश्वास व्यक्त केला असेल त्याला आज आज 1.55 लाख रुपये मिळाले असते. तर आठ वर्षांपूर्वी 1 लाख रुपये केलेली गुंतवणूक ही आज 69 लाख रुपयाची झाली असती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.