Share Market: The market remained stable but the price of Zomato increased  Dainik Gomantak
अर्थविश्व

Share Market: बाजार स्थिर मात्र 'झोमॅटोचा' भाव वधारला

सेक्टर इंडेक्समधून निफ्टी आयटी आणि मेटल शेअरचा बाजाराला((Share Market) पाठिंबा मिळत आहे. निफ्टी रिअल्टी, फायनान्शियल सर्व्हिसेस, बँक जवळपास अर्ध्या टक्क्यांनी खाली आहे.

दैनिक गोमन्तक

जागतिक बाजारपेठेत स्थिरता आल्याने आज शेअर बाजार(Share Market) चांगल्या अंकांनी सुरू झालेला पाहायला मिळाला मात्र कालच्या तुलनेत बाजार थोड्या कमी अंकांनीच सुरू झाला आहे. सेन्सेक्सचा(Sensex) विचार करता तो आज जवळपास 52700 अंकांनी सुरु झाला आहे आणि आता ही बातमी लिहिताना 52916 इतक्या अंकांवर पोहोचलं आहे त्याचबरोबर निफ्टीही स्थिरतेतच सुरू झालेली पाहायला मिळाली निफ्टीच्या(Nifty) अंकाची सुरवात आज 15,800 नी झाली आहे म्हणजे कालच्या बाजाराचा विचार करता 76 अंकांनी कमी.

अग्रभागी असणाऱ्या शेअर्स मध्ये(Stock Market) विक्रीदरम्यान, लहान आणि मध्यम आकाराच्या समभागांची निर्देशांकही वाढत आहे.सेक्टर इंडेक्समधून निफ्टी आयटी आणि मेटल शेअरचा बाजाराला पाठिंबा मिळत आहे.तर निफ्टी रिअल्टी, फायनान्शियल सर्व्हिसेस, बँक जवळपास अर्ध्या टक्क्यांनी खाली आहे.

शुक्रवारी परदेशी बाजारातील मजबुतीचा परिणामही स्थानिक बाजारात दिसून आला आहे. बीएसईचा 30 समभागांचा सेन्सेक्स 130 अंकांच्या वाढीसह 52967.87 वर उघडला होता. तर एनएसईचा 50 शेअर्स असलेला निफ्टीही गुरुवारच्या बंद पातळीच्या तुलनेत 32 अंकांनी वाढून 15856.80 वर व्यापार सुरवंट झाली होती.

तर दुसरीकडे देशाचे लक्ष ज्या कंपनीकडे लागून होते त्या झोमॅटो कंपनीच्या शेअर्सचे आज बाजारात लिस्टिंग झाले म्हणजेच झोमॅटो कंपनीचे शेअर्स आज बाजारात विक्रीस आले आणि त्यांच्या किमती वाढतानाच दिसत आहे कारण 76 रुपयांच्या इश्यू प्राइजसहचा शेअर 107.90 रुपयांवर सुरु झाला होता . आणि सध्या एनएसई वर 54 रुपयांच्या वाढीसह 131 रुपयांवर पोहोचला आहे.झोमॅटो कंपनीने 23 ते 27 जुलै दरम्यान त्यांचे शेअर्स बाजारात आणण्याची योजना आखली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

'पर्यटनाला ओव्हर-रेग्युलेशनचा फटका!' फुकेटच्या तुलनेत गोव्यातील हॉटेल्स दुप्पट महाग; अमिताभ कांतांचे Tweet Viral

Viral Video: व्हिडिओ गेमसाठी 2 वर्षे स्वतःला खोलीत कोंडून घेतलं, दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून उडाला थरकाप; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल!

पहिल्यांदाच गाजवणार 'तेलगू' सिनेसृष्टी! अक्षय खन्ना साकारणार अजेय शुक्राचार्य; अंगावर शहारे आणणारा लूक Viral

ॲशेसवर कांगारुंची मोहोर! WTC गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची बादशाहत कायम; इंग्लंडच्या पराभवाचा टीम इंडियाला फायदा की तोटा?

SCROLL FOR NEXT