Air India: मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी महत्वाची बातमी

कोविडमुळे (Corona) मृत्यू झाल्यास प्रत्येक एयर इंडिया (Air India) कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची भरपाई देण्यात आली.
Important news for the families of deceased employees
Important news for the families of deceased employeesDainik Gomantak

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री व्ही. के. सिह यांनी म्हटले की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 14 जुलैपर्यंत एयर इंडियाच्या 56 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी लोकसभेत एका प्रश्नाचे लिखित उत्तरात ही माहिती दिली .

* प्रत्येक स्थायी कर्मचार्‍याच्या कुटूंबाला 10 लाखांची भरपाई

सिह म्हणाले, कोविड-19 (Covid-19) एयर इंडियाच्या (Air India) 3,523 कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे. 14 जुलै 2021 पर्यंत या कर्मचाऱ्यांपैकी 56 जणाचा मृत्यू झाला होता. मंत्री म्हणाले की, कोविड बाधित कर्मचारी आणि त्यांच्या त्यांच्या कुटुंबीयांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एयर इंडियाने (Air India) अनेक पावले उचलली आहेत. ते म्हणाले की कोविडमुळे (Covid-19) मृत्यू झाल्यास प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची भरपाई देण्यात आली होती.

Important news for the families of deceased employees
ShareMarket: सुट्टीनंतर बाजार तेजीत Sensex 600 अंकांनी वाढला

* एका दिवसात 41,383 नव्या रुग्णांची नोंद

भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. एका दिवसात कोरोनाचे 41,383 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर आतापर्यंत संक्रमित रुग्णांची संख्या 3,12,57,720 वर पोहोचली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,09,394 नोंदल्या गेली आहे. या संख्येत सलग दुसऱ्या दिवशीही वाढ झाली आहे.

* 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी कायम

करोना विषाणूच्या साथीमुळे नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) 31 जुलै 2021 पर्यंत भारतात अनुसूचित आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे चालवण्यास बंदी घातली आहे. हे निर्बंध आंतरराष्ट्रीय ऑल-कार्गो संचालन आणि विशेष करून विमानंन नियमांद्वारे मान्यता प्राप्त उड्डाणाना लागू होणार नाही. निवडक देशांसोबत द्विपक्षीय एयर बबल करारांतर्गत उड्डाणे सुरू राहतील.

Important news for the families of deceased employees
Byju’s ने 3,729 कोटी रुपयाला खरेदी केली अमरिकेची ही मोठी कंपनी

* कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंड

अलीकडेच डीजीसीएन म्हणाले की सर्व विमानतळ ऑपरेटरने विमानतळावर सर्वांनी मास्क योग्य प्रकारे लावले आहे की याकडे लक्ष ठेवावे. तसेच विमानतळच्या परिसरात सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. डीजीसीएने विमान कंपण्याना अचानक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जर विमानात नियमांचे पालन न केल्याचे आढळल्यास त्यांना दंड होऊ शकतो. तसेच वारंवार चेतावणी देऊन देखील एखाद्या व्यतीने पालन न केल्यास त्याला ' अनियंत्रित प्रवासी' समजले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com