share market dainikgomantak
अर्थविश्व

दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात तेजी, सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी वधारला

शेअर बाजारात सध्या प्रचंड अस्थिरता सुरू

दैनिक गोमन्तक

सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार (Share Market ) तेजीने उघडला. सेन्सेक्स 487 अंकांच्या उसळीसह 57066 च्या पातळीवर उघडला. सध्या बाजारात 700 हून अधिक अंकांची उसळी दिसून येत आहे. सेन्सेक्स 521 अंकांच्या वाढीसह 57101 च्या पातळीवर तर निफ्टी 167 अंकांच्या उसळीसह 17120 च्या पातळीवर व्यवहार करत होता. (Share Market Updates)

शेअर बाजारात सध्या प्रचंड अस्थिरता सुरू आहे. मात्र, तरीही विदेशी गुंतवणूकदारांचा मूड खराब असून त्यांची सातत्याने विक्री सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 3303 कोटींची विक्री केली तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 1870 कोटींची खरेदी केली. निव्वळ आधारावर 1433 कोटींची विक्री झाली.

बाजारात आज बंपर तेजी आहे. सकाळी 9.36 वाजता सेन्सेक्समध्ये 716 अंकांची उसळी पाहायला मिळत आहे आणि तो 57296 च्या पातळीवर व्यवहार करत होता. सेन्सेक्सच्या टॉप-30 मधील सर्व शेअर्स हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. इंडसइंड बँक, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज फायनान्स सर्वाधिक वाढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT