महागाईचा आणखी एक धक्का, मोबाईल रिचार्जचे दर पुन्हा वाढणार

असे सिम बंद केले जाणार
Before getting mobile recharge, see here Airtel, BSNL, Jio and Idea-Vodafone’s best plans, unlimited calling and data
Before getting mobile recharge, see here Airtel, BSNL, Jio and Idea-Vodafone’s best plans, unlimited calling and dataDainik Gomantak

तुमच्या मोबाईल रिचार्ज पॅकची किंमत पुन्हा वाढणार आहे. काही महिन्यांपूर्वीही हा प्रकार घडला होता. मोबाईल कंपन्यांनी (टेलिकॉम ऑपरेटर्स) यासाठी तयारी सुरू केली आहे. पॅकच्या किमतीत वाढ झाल्यामुळे तुमचा पॅक महाग होणार आहे. आधीच वाढलेल्या महागाईत हा आणखी एक धक्का असेल. जे ग्राहक अॅक्टिव्ह नाहीत त्यांच्या सिमकडे मोबाईल कंपन्या लक्ष देत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. त्यामुळे मोबाईल डाटा आणि कॉलचे दर वाढणार आहेत. ज्यांनी सिम घेतले आहे, पण ते रिचार्ज करत नाहीत असे सिम बंद केले जातील. याचा तोटा भरुन काढण्यासाठी मोबाईल कंपन्या रिचार्जचे दर वाढवणार आहे. (Mobole Recharge Pack Updates)

सरासरी महसूलामध्ये सुधारणा करण्यासाठी मोबाईलच्या रिचार्जचे दर वाढवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये दरात वाढ करण्यात आली होती. या दरवाढीनंतर एकापेक्षा जास्त सिमकार्ड असलेल्या बहुतांश ग्राहकांनी सिम बंद केले. जी सिम रिचार्जशिवाय चालत होती ती बंद करण्यात आली. जास्त वापरकर्त्यांची संख्या वाढल्याने अशा ग्राहकांना वगळण्यात आल्याने सर्वाधिक फायदा रिलायन्स जिओला झाला.

Before getting mobile recharge, see here Airtel, BSNL, Jio and Idea-Vodafone’s best plans, unlimited calling and data
PBKS vs CSK: शिखर धवनने रचला इतिहास

तज्ञ काय म्हणतात

दूरसंचार क्षेत्रातील तज्ञांनी सांगितले की, भारती एअरटेलला आपला ARPU आणखी वाढवायचा आहे आणि Jio त्याच्या नेटवर्क वापरकर्त्यांची संख्या सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत भविष्यात दरात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी डिसेंबर मधील 163 च्या तुलनेत यावर्षी 200 पर्यंत ARPU नेण्याची तयारी करत आहे. Vodafone Idea ने देखील ARPU वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

आजच्या काळात मोबाईल ही एक अत्यावश्यक सेवा बनली आहे, त्यामुळे त्याचा वापर वाढत आहे.

अन्य एका तज्ज्ञाने सांगितले की, मोबाईलच्या रिचार्ज दरात वाढ इतक्या लवकर होत नाही कारण कंपन्या अजूनही मागील दरवाढीचा परिणाम तपासत आहेत. त्यांना आधीच्या वाढीचा कल कळल्यानंतर ते पुढील दरवाढीचा विचार करतील. तज्ञांचे असे मत आहे की कंपन्या अजूनही 5G लिलावात गुंतलेल्या आहेत आणि सर्वांचे लक्ष तिकडे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com