Share Market: Nifty on high 18 thousand Sensex cross 60 thousand
Share Market: Nifty on high 18 thousand Sensex cross 60 thousand Dainik Gomantak
अर्थविश्व

निफ्टीचा 18 हजारांचा विक्रमी उच्चांक तर सेन्सेक्सही 60 हजारांच्या पार

दैनिक गोमन्तक

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट (Share Market) तेजीत पाहायला मिळत आहे. मार्केटमध्ये सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) आज दोन्ही निर्देशांक वाढताना दिसत आहे. निफ्टीने 18 हजारांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे तर बीएसई सेन्सेक्स सुद्द्धा 60,300वर पोहोचकला आहे. बाजारात आज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) , टेक महिंद्रा (Tech Mahindra), इन्फोसिस (Infosys), एचसीएल टेक्नॉलॉजीज(HCL), भारती एअरटेलला (Airtel)सर्वाधिक नुकसान झाले आहे . त्यांच्या शेअर्समध्ये जवळपास 7 टक्क्यांपर्यंत घट दिसून आली आहे.(Share Market: Nifty on high 18 thousand Sensex cross 60 thousand)

तर दुसरीकडे मार्केटमध्ये मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. रिलायन्स कंपनीचे शेअर्स आज उच्चांकावर पोहोचलेले पाहायला मिळत आहेत.

तर गुंतवणुकीसाठी एखाद्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर निफ्टी आयटीमध्ये 4 टक्क्यांहून अधिक घट दिसून आली. दुसरीकडे, बँक निफ्टीमध्ये अर्ध्या टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. निफ्टी ऑटोमध्ये एक टक्क्यांहून अधिक आणि निफ्टी मेटलमध्ये सुमारे एक टक्क्यांची वाढ झाली आहे.

दरम्यान मागच्या आठवड्यातही मार्केट तेजीतच होते मागील आठवड्याचा विचार करता सेन्सेक्सच्या पहिल्या दहापैकी आठ कंपन्यांचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 2,32,800.35 कोटी रुपयांनी वाढले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सर्वाधिक लाभात होते. गेल्या आठवड्यात बीएसईच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,293.48 अंकांनी किंवा शुक्रवारी सेन्सेक्सने 60,000 चा आकडा पार केला होता.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅपिटलायझेशन रिपोर्टिंग आठवड्यात 93,823.76 कोटी रुपयांनी वाढून 16,93,170.17 कोटी रुपये इतके झाले आहे .तर टीसीएसचे बाजार मूल्यांकन 76,200.46 कोटी रुपयांच्या उडीसह 14,55,687.69 कोटी रुपये होते. या कालावधीत इन्फोसिसची बाजारपेठ 24,857.35 कोटी रुपयांनी वाढून 7,31,107.12 कोटी रुपये आणि बजाज फायनान्सची 12,913.91 कोटी रुपयांनी वाढून 4,66,940.59 कोटी रुपये झाली. एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्यांकन आठवड्यात 10,881.09 कोटी रुपयांनी वाढून 8,87,210.54 कोटी रुपये झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT