SBI-PNB-ICICI-HDFC
SBI-PNB-ICICI-HDFC Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI-PNB-ICICI-HDFC सह सर्व बँकांनी दिली आनंदाची बातमी, करोडो ग्राहकांची चांदी!

Manish Jadhav

RD Interest Rates: तुम्ही आरडी (Bank RD) उघडली आहे का...? किंवा येत्या काही दिवसांत तुमचाही आरडी करण्याचा प्लॅन असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

बँकांमध्ये गुंतवणूक केल्याने लोकांना बरेच फायदे मिळतात आणि बरेच चांगले व्याज देखील मिळते. आवर्ती ठेवीवर तुम्हाला चांगले व्याज मिळते.

आज आम्ही तुम्हाला SBI (SBI RD), PNB (PNB RD) सह कोणत्या बँका RD वर किती व्याज देत आहेत ते सांगणार आहोत...

अनेक बँकांनी व्याजदर वाढवले

तुम्ही ऑफलाइन, ऑनलाइन किंवा मोबाइल बँकिंगद्वारे आरडी उघडू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि आयसीआयसीआय बँकेने आवर्ती ठेवी म्हणजेच आरडीवरील व्याजात वाढ केली आहे.

आता या बँका पूर्वीपेक्षा जास्त व्याज देत आहेत. जर तुम्ही RD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कोणत्या बँकेत किती व्याज मिळत आहे ते जाणून घ्या...

आरडी स्कीम म्हणजे काय?

आरडी ही एक लहान बचत योजना आहे. यामध्ये तुम्ही पोस्ट ऑफिस (Post Office) किंवा बँकांमधूनही खाते उघडू शकता आणि त्यात तुम्ही फक्त 5 वर्षांसाठी गुंतवणूक करु शकता.

यामध्ये पैसे गुंतवल्यावर तुम्हाला बँकांकडून अधिक चांगले व्याज दिले जाते आणि बँकेकडून आरडी करुन घेतल्यावर तुम्हाला अनेक सुविधा दिल्या जातात. सर्व बँका RD वर वेगवेगळे व्याज देतात.

SBI RD व्याज दर

स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला 12 महिन्यांपासून 120 महिन्यांपर्यंत 6.80 ते 7 टक्के व्याज देत आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 100 रुपये गुंतवावे लागतील.

PNB RD व्याज दर

PNB बँक 6 महिने ते 10 महिन्यांच्या RD वर 5.5 ते 7.25 टक्के व्याज देते. तुम्ही हप्त्याच्या शेवटच्या दिवशीही आरडी भरु शकता.

HDFC बँक RD व्याज

HDFC बँक तुम्हाला 6 महिन्यांपासून ते 120 महिन्यांपर्यंतच्या RD वर 4.5 ते 7.10 टक्के व्याज देते, ज्यामध्ये तुम्हाला दररोज गुंतवणूक करावी लागते.

ICICI बँक RD व्याज दर

ICICI बँक तुम्हाला RD वर 6 महिने ते 120 महिन्यांपर्यंत RD वर 4.75 ते 7.10 टक्के व्याज देते. ज्यामध्ये तुम्ही किमान 500 रुपये गुंतवू शकता.

येस बँक आरडी व्याज दर

येस बँक तुम्हाला RD वर 6 महिने ते 10 वर्षांपर्यंत RD वर 6 ते 7.50 टक्के व्याज देते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT