PNB-ICICI-HDFC बँकर्ससाठी महत्त्वाची बातमी, मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार नाही!

Bhagwat Karad: नवीन नियम बनल्यानंतर तुम्हाला किमान शिल्लक राखण्याची गरज भासणार नाही. वेगवेगळ्या बँक आणि खात्यानुसार किमान शिल्लक रक्कम निश्चित केली जाते.
PNB-ICICI-HDFC
PNB-ICICI-HDFCDainik Gomantak
Published on
Updated on

Minimum Balance In Bank Account: तुमच्या बँक खात्यात शिल्लक रक्कम न ठेवल्याबद्दल तुम्हाला कधीतरी दंडाला सामोरे जावे लागले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. होय, भविष्यात असे झाल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार नाही.

नवीन नियम बनल्यानंतर तुम्हाला किमान शिल्लक राखण्याची गरज भासणार नाही. वेगवेगळ्या बँक आणि खात्यानुसार किमान शिल्लक रक्कम निश्चित केली जाते. खातेदाराला किमान शिल्लक रक्कम न ठेवल्याबद्दल दंड भरावा लागतो.

किमान शिल्लक वर मोठे विधान

खात्यातील किमान शिल्लक रक्कम ठेवण्याबाबत अर्थ राज्यमंत्री भगवंत किशनराव कराड यांनी गेल्या काही दिवसांत मोठे वक्तव्य केले होते. त्यांनी बँकांच्या संचालक मंडळाला आवाहन करुन किमान शिल्लक रक्कम न ठेवणाऱ्यांच्या खात्यावरील दंड रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकता, असे सांगितले.

कराड म्हणाले होते की, बँका (Banks) या स्वतंत्र संस्था आहेत. अशा स्थितीत संचालक मंडळ किमान रक्कम न ठेवल्यास दंड माफ करु शकते.

PNB-ICICI-HDFC
SBI, PNB, HDFC सह 'या' बॅंकात खाते असेल तर..., 6 महिन्यांत तुम्हाला मिळतील इतके पैसे !

त्यावेळी, किमान रक्कम ठेवण्याबाबत माध्यमांनी अर्थ राज्यमंत्र्यांना प्रश्न विचारला होता. ज्या खात्यांमध्ये विहित किमान पातळीपेक्षा कमी ठेवी जातात त्यावर कोणताही दंड आकारला जाऊ नये, अशा सूचना बँकांना देण्याचा सरकार (Government) विचार करत आहे का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com