Bank FD Rates: तुमचेही देशातील सरकारी किंवा खासगी बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सध्या देशातील खासगी आणि सरकारी बँका ग्राहकांना मुदत ठेवी सुविधा देत आहेत. तुमचीही FD झाली असेल किंवा ती पूर्ण करायची योजना असेल, तर आता तुम्ही फक्त 6 महिन्यांत मोठा नफा कमवू शकता. एसबीआय, पीएनबीसह अनेक बँकांनी याबाबत माहिती दिली आहे.
मुदत ठेव हा पैसा वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात. यासोबतच तुम्हाला खात्रीशीर परताव्याची सुविधाही मिळते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, केवळ 6 महिन्यात तुमच्या पैशातून चांगले रिटर्न कसे मिळू शकतात.
देशातील खाजगी बँका 6 महिन्यांसाठी एफडी मिळवण्याची सुविधा प्रदान करतात. तुम्ही तुमचे पैसे SBI, PNB, HDFC बँक, बँक ऑफ बडोदा आणि ICICI सारख्या मोठ्या बँकांमध्ये गुंतवू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या बँका तुम्हाला किती व्याज देत आहेत –
तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (Bank Of India) 6 महिन्यांची एफडी केली तर बँक 4.50 टक्के दराने सर्वसामान्य नागरिकांना व्याजाचा लाभ देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना बँक 5 टक्के दराने व्याज देत आहे.
याशिवाय, PNB सर्वसामान्य नागरिकांना 6 महिन्यांच्या FD वर 4.50 टक्के दराने व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 5.00 टक्के दराने व्याज मिळणार आहे.
बँक ऑफ बडोदा बद्दल बोलायचे झाल्यास, 6 महिन्यांच्या FD वर 4.50% व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 5.00 टक्के दराने व्याज मिळणार आहे.
एचडीएफसी बँकेबद्दल बोलायचे झाल्यास, ही बँक सामान्य नागरिकांना 6 महिन्यांसाठी 4.50 टक्के दराने व्याजाचा लाभ देत आहे. याशिवाय, ICICI बँकेच्या ग्राहकांना 4.75 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.