SBI Customers Alert, SBI Guidelines for customers, Alert for SBI Customers
SBI Customers Alert, SBI Guidelines for customers, Alert for SBI Customers  Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI Customers Alert: 'अशा' मॅसेजला पडू नका बळी, SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी

दैनिक गोमन्तक

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयने आपल्या अंदाजे 45 कोटी ग्राहकांसाठी एक महत्वाची माहिती शेअर केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना होणारी फसवणूक (Fraud) टाळण्यासाठी आवाहन केले आहे. बँकेने (Bank) यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

बँकेने काय सांगितले आहे?

एसबीआयने (SBI) आपल्या अधिकृत वेबसाइटवर लिहिले आहे की, प्रिय ग्राहक..तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात! त्यामुळे सुरक्षित डिजिटल बँकिंग सुरक्षित राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

1. ई-मेल/एसएमएस वरून मिळालेल्या लिंकवर क्लिक करू नका.

2. एसबीआय कधीच तुमची वैयक्तिक माहिती विचारणारी कोणतीही लिंक पाठवत नाही.

3. तुमचा पासवर्ड/कार्ड क्रमांक/CVV/OTP सारखी आर्थिक माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसबोत शेअर करू नका.

4. बक्षिसे/लॉटरी/आयकर रिफंडच्या ईमेल/एसएमएसला बळी पडू नका.

5. नियमितपणे तुमचा पासवर्ड बदलत राहा.

6. असे कोणतेही अॅप डाउनलोड करू नका ज्याला काही अज्ञात व्यक्तीने सल्ला दिला असेल. त्या मेसेजवर क्लिक केल्यानंतर तुमच्या बँक खात्यासंबंधित माहिती फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते.

ग्राहकांनी येथे तक्रार करावी

ग्राहकांना जर कोणत्याही लिंक बद्दल जर संशय आल असेल तर त्यांची तक्रार करण्यासाठी report.phishing@sbi.co.in या लिंक वर मेल करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT