Star Mark On 500 Note Dainik Gomantak
अर्थविश्व

Star Mark On ₹ 500 Note: स्टार चिन्ह असलेल्या तुमच्याकडील नोटा खऱ्या की खोट्या? आरबीआयने केला खुलासा

RBI: 2016 मधील काही नोटांमध्ये * चिन्ह आहे. यावरुन सोशल मीडियावर या स्टार चिन्ह असलेल्या नोटा नकली असल्याची अफवा पसरली आहे.

Ashutosh Masgaunde

Rs 500/- Banknotes with a ‘star’ mark are valid: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2016 मध्ये महात्मा गांधी मालिकेतील ₹ 500 मूल्याच्या नोटा जारी केल्या आहेत.

ज्यामध्ये दोन्ही नंबर पॅनलमध्ये इनसेट अक्षर ‘E’, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर. पटेल यांची स्वाक्षरी, प्रिंटिंगचे वर्ष 2016 आणि बँकेच्या रिव्हर्सवर स्वच्छ भारतचा लोगो छापला आहे.

2016 मधील काही नोटांमध्ये * चिन्ह आहे. यावरुन सोशल मीडियावर या स्टार चिन्ह असलेल्या नोटा नकली असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होत आहे.

ही बाब लक्षात येताच प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने यावर खुलासा करत या नोटा नकली नसल्याचा खुलासा केला आहे. तसेच या नोटा व्यवहार योग्य असल्याचेही म्हटले आहे.

यासाठी पीआयबीने (PIB) आरबीआय चे एक प्रसिद्ध पत्रक ट्विट केले आहे.

RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की, “काही कॅप्शन दिलेल्या बँक नोट्समध्ये उपसर्ग आणि संख्या यांच्यातील जागेत नंबर पॅनेलमध्ये अतिरिक्त वर्ण ‘*’ (स्टार) असेल.

या नोटा असलेल्या बंडलमध्ये नेहमीप्रमाणे 100 नोटा असतील परंतु त्या क्रमाने नाहीत. ‘स्टार’ नोट्स असलेल्या नोटांच्या बंडलची सहज ओळख होण्यासाठी अशा बंडल्सवरील बँड या नोटांची बंंडलमधील संख्या सूचित करतील.

₹ 500 च्या ‘स्टार’ नोटा 2016 मध्ये प्रथमच जारी केल्या आहेत.

रु. १०/-, रु. २०/-, रु. 50/- आणि रु. 100/- च्या ‘स्टार’ असलेल्या नोटा 2006 पासून चलनात आहेत.

'स्टार' नोटा चलनात आणण्याचे कारण आणि योजना RBI ने 19 एप्रिल 2006 रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात तपशीलवार दिली होती.

या सर्व पुराव्यांवरून, असा निष्कर्ष काढता येतो की 500/- रुपयांच्या 'स्टार' क्रमांकाच्या नोटा नकली नसून कायदेशीर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT