Sahara India Refund: तुमचेही पैसे सहारामध्ये अडकलेत? अशी आहे परतावा मिळवण्याची प्रोसेस

Sahara India Group: ज्यांनी 10,000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे, त्यांना देखील फक्त 10,000 रुपयांची रक्कम दिली जाईल.
Sahara India Group
Sahara India GroupDainik Gomantak
Published on
Updated on

How do I claim my Sahara India Refund Portal?: सहारा समूहाच्या (सहारा इंडिया) सहकारी संस्थेत अडकलेले पैसे परत करण्यासाठी सुरू केलेल्या रिफंड पोर्टलवर मोठ्या संख्येने गुंतवणूकदार अर्ज करत आहेत. आठवडाभरात सात लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळाल्याचा दावा केला आहे.

तुमचे पैसेही सहारामध्ये अडकले असतील, तर तुम्ही CRCS-सहारा रिफंड पोर्टलवर तुमच्या पैशाच्या परताव्यासाठी अर्ज करू शकता.

अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत सहाराच्या को-ऑपरेटिव्हमध्ये अडकलेले पैसे गुंतवणूकदारांना परत केले जातील.

या गुंतवणूकदारांना परत मिळतील पैसे

सहाराच्या चार सहकारी संस्थांमधील अशा सुमारे 4 कोटी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील, ज्यांचा गुंतवणूक कालावधी पूर्ण झाली आहे.

सरकारने म्हटले आहे की सध्या 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवणूकदारांना परत केली जाईल. म्हणजेच पहिल्या टप्प्यात ज्या गुंतवणूकदारांची 10,000 रुपये गुंतवणूक आहे त्यांची ठेव रक्कम परत केली जाईल.

ज्यांनी 10,000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे, त्यांना देखील फक्त 10,000 रुपयांची रक्कम दिली जाईल.

Sahara India Group
PhonePe Tax: आणखी काय पाहिजे! आता फोन पे वरून भरता येणार इनकम टॅक्स

या संस्थांमधील पैसे परत मिळतील

सहारा समूह - सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या सहकारी संस्थांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी पोर्टल विकसित केले गेले आहे.

परतावा मिळाल्याचे कसे कळेल?

जर तुमचा परतावा मंजूर झाला असेल, तर तुम्हाला एसएमएसद्वारे यासंबंधीची सूचना मिळेल. लक्षात ठेवा की अर्जाच्या वेळी दिलेला बँक खाते क्रमांक पुन्हा बदलता येणार नाही.

हे देखील लक्षात ठेवा की जर तुमचा बँक खाते क्रमांक आधारशी लिंक नसेल, तर तुम्ही परताव्यासाठी अर्ज करू शकत नाही.

सहारा रिफंड पोर्टलद्वारे अर्ज करण्यासाठी, गुंतवणूकदारास सदस्यत्व क्रमांक, ठेव खाते क्रमांक, आधारशी जोडलेला मोबाइल क्रमांक, ठेव प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे आवश्यक आहेत.

Sahara India Group
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल - डिझेलचे आजचे दर जाहीर, जाणून घ्या ताजे भाव

४५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण होणार

गुंतवणूकदार स्वतः या पोर्टलवर लॉग इन करून त्यांची नावे नोंदवू शकतात आणि पडताळणीनंतर परतावा प्रक्रिया सुरू होईल. पैसे परत करण्याची ही संपूर्ण प्रक्रिया ४५ दिवसांत पूर्ण होईल.

अर्ज केल्यानंतर, सहारा इंडियाच्या गुंतवणूकदारांच्या कागदपत्रांची सहारा समूहाच्या समित्यांकडून ३० दिवसांत पडताळणी केली जाईल आणि त्या गुंतवणूकदारांना ऑनलाइन दावा दाखल केल्यानंतर १५ दिवसांच्या आत एसएमएसद्वारे कळवले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com