Pay tax through Phonepe: PhonePe ने भारतीय करदात्यांच्या गोष्टी सुलभ करण्यासाठी 'इन्कम टॅक्स पेमेंट' हे नवीन फिचर आपल्या अॅपवर समाविष्ठ केले आहे.
याच्या मदतीने करदाते त्यांचा कर भरू शकतात. वास्तविक, आर्थिक वर्ष 2022-23 साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. यासाठी युजर्स क्रेडिट कार्ड किंवा UPI वापरू शकतात.
भारतीय डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe चे वैशिष्ट्य दोन्ही प्रकारच्या करदात्यांना म्हणजे वैयक्तिक आणि व्यवसाय यांना आगाऊ कर भरण्याची परवानगी देईल.
यासाठी करदात्याला टॅक्स पोर्टलवर स्वतंत्रपणे लॉग इन करण्याची गरज नाही. हे वैशिष्ट्य सादर करण्याचा उद्देश करदात्यांना सुलभ अनुभव प्रदान करणे हा आहे. PhonePe ने ही माहिती दिली आहे.
या वैशिष्ट्यासाठी PhonePe ने PayMate सोबत भागीदारी केली आहे. PayMate एक डिजिटल B2B पेमेंट आणि सेवा देणारी यंत्रणा आहे.
फोन पेवरील फिचर्सच्या मदतीने करदाते क्रेडिट कार्ड किंवा यूपीआयच्या मदतीने कर भरू शकतात. क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 45 दिवसांसाठी व्याजमुक्त रक्कम उपलब्ध असेल.
PhonePe चे नवीन फीचर फक्त कर भरण्याची सुविधा देते, त्याद्वारे ITR दाखल करता येऊ शकत नाही. आयटीआर फाइलिंगसाठी करदात्यांना दुसरी प्रक्रिया फॉलो करावी लागेल.
Android आणि iPhone वर उपलब्ध असलेले PhonePe अॅप उघडा.
अॅपवर दिलेल्या 'इन्कम टॅक्स' या पर्यायावर क्लिक करा.
त्याचा कर प्रकार, मूल्यांकन वर्ष आणि पॅन कार्ड तपशील निवडा.
यानंतर एकूण कर रक्कम प्रविष्ट करा, नंतर पेमेंट मोड निवडा.
एकदा पेमेंट केल्यावर, ते दोन कामकाजाच्या दिवसांत इनकम टॅक्स पोर्टलवर जमा केले जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.