LPG Cylinder gas price  Dainik Gomantak
अर्थविश्व

कमर्शियल LPG सिलेंडर च्या किमतीत घट

आजपासून दिल्लीत 19 किलोचे व्यावसायिक सिलिंडर 1907 रुपयांना मिळणार आहे

दैनिक गोमन्तक

राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (LPG cylinder) किंमतीत 91.50 रुपयांची कपात केली आहे. आजपासून दिल्लीत 19 किलोचे व्यावसायिक सिलिंडर 1907 रुपयांना मिळणार आहे. मात्र, घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला नवीन दर जारी करतात. (LPG Cylinder Rates Fall)

नवीन दरामध्ये विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच दिल्लीत घरगुती गॅसची किंमत कोणत्याही बदलाशिवाय 899.5 रुपये आहे. त्याचबरोबर तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या किमती कमी केल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे जानेवारीमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 102.50 रुपयांनी कपात करण्यात आली होती.

नॅशनल ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 1 फेब्रुवारीपासून व्यावसायिक 19-किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी केली आहे. आजपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1907 रुपये होईल असे सांगण्यात येत आहे.

दिल्लीत 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 91.5 रुपयांनी कमी होऊन 1,907 रुपयांवर आली आहे. कोलकात्याबद्दल बोलायचे झाले तर, व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 89 रुपयांनी कमी होऊन 1987 रुपयांवर आली आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस 1857 रुपये झाला, जो पूर्वी 1948.5 रुपये होता. त्याच वेळी, चेन्नईमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 2080.5 रुपयांवर गेली आहे. येथे 50.5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तुमच्या शहरातील गॅस सिलेंडरची नवीन किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही सरकारी तेल कंपनीची अधिकृत वेबसाइट पाहू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT