Online payment System  Dainik Gomantak
अर्थविश्व

डिजिटल पेमेंट चुकीच्या खात्यात? पहा RBI च्या गाइडलाइन्स

तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे (Money) पाठवले, ते परत मिळविण्यासाठी RBI ची मार्गदर्शक तत्त्वे देखील जाणून घ्या.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: ऑनलाइन पेमेंट (Online payment) आणि UPI पेमेंटमुळे बँकिंग (Banking) सुविधा सोपी झाली आहे. आता बँकिंग प्रक्रियेसाठी बँकेत जाण्याची गरज लागत नाही. बहुतेक कामे आता ऑनलाइनच्या माध्यमातूनच केली जातात. पण डिजिटल पेमेंटच्या (Digital payment) ट्रेंडमध्ये, कधीकधी त्याचे धोकेही समोर येतात. काहीवेळा तुम्ही ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू शकता किंवा व्यवहाराच्या वेळी चुकीच्या खात्यात पैसे जातात. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आता बँकिंग सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यासाठी अलीकडच्या काळात अनेक पावले उचलली आहेत. ऑनलाइन बँकिंगमध्ये जर तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे पाठवले, ते परत मिळविण्यासाठी या उपायांबद्दल जाणून घ्या. जेणेकरून तुम्ही भविष्यात सावधगिरी बाळगू शकता. या संदर्भात RBI ची मार्गदर्शक तत्त्वे देखील जाणून घ्या. ज्याच्या मदतीने आपण अशा घटनांमध्ये त्वरित परताव्याची प्रक्रिया सुरू करू शकता.

अशा घटना लक्षात घेऊन आरबीआयने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता जर तुम्हाला एटीएम (ATM), यूपीआय (UPI) किंवा नेट बँकिंग मधून कोणताही व्यवहार करायचा असेल, तर तुम्हाला लगेच एक मेसेज येईल. ज्यात तुम्ही योग्य व्यवहार केला आहे की तो चूकीचा आहे याची खात्री करता येईल. यात तुम्हाला एक फोन नंबर देखील दिला जाईल. जर तुमचा तो व्यवहार चुकला असेल तर तुम्ही लगेच त्या फोन नंबरवर सांगू शकता की हा व्यवहार चुकून झाला आहे. अशा मेसेजवर तुमच्या बँकेला त्वरित कारवाई करावी लागेल असे निर्देश RBI ने दिले आहेत.

अश्या वेळी काय करता येईल:

जर पैसे अडकले तर तुम्हाला तुमच्या बँकेला (Bank) त्याबद्दल कळवावे लागेल. हा व्यवहार फसवणुकीमुळे झाला आहे की तुमच्या चुकीमुळे, याचा तपशील बँकेला द्यावा लागेल. तुम्ही तुमच्या बँकेला ग्राहक सेवा क्रमांकावर (Customer service number) कॉल करू शकता किंवा स्वतः बँकेत जाऊ शकता. येथे तुम्हाला कोणाच्या खात्यात पैसे गेले, त्याचे बँक खाते, तारीख, वेळ इत्यादी सर्व काही माहिती द्यावी लागेल. ज्याला तुम्ही पैसे पाठवले आहेत त्या बँकेशी संपर्क साधता येईल.

जर प्राप्तकर्त्याने पैसे परत करण्यास नकार दिला तर...

जर बँकेने संपर्क साधूनही प्राप्तकर्त्याने पैसे परत करण्यास नकार दिला तर तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई (Legal action) करू शकता. हे प्रकरण पुढे न्यायालयात न्यायचे असेल तर याबद्दल आरबीआय तुम्हाला निर्देशित देईल. मात्र, या प्रकियेयेला न्यायालयात (Court) निकाल लागण्यास वेळ लावू शकतो. न्यायालयात तुमचा व्यवहार पहिला जाईल. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही चुकून पैसे ट्रान्सफर केले असतील तर जबाबदारी तुमची आहे. अशा वेळी बँक सुद्धा त्यासाठी जबाबदार राहणार नाही.

जर तुम्ही प्राप्तकर्त्याचा खाते क्रमांक चुकून टाकला असेल आणि तुमच्या खात्यातून पैसे गेले असतील तर तुमचे पैसे आपोआप परत जमा होतील. त्याच वेळी, जर तुम्ही UPI व्यवहाराच्या(transaction) वेळी चुकीचा खाते क्रमांक टाकला असेल, तर तुमचे पैसे कापले जाणार नाहीत कारण हा व्यवहार पूर्ण होऊ शकणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Crime: मुंगूल गँगवॉरप्रकरणी नवी अपडेट! अन्य 11 संशयितांचा जामिनासाठी अर्ज; नायायालयात होणार सुनावणी

Goa ZP Election Result 2025 Live Update: मायकल लोबोंना धक्का; कळंगुटमध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर

Goa Crime: ‘ते’ तोतया पोलिस महाराष्ट्रातील असल्याचा अंदाज! CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; मराठीत बोलत असल्याचे उघड

Goa Politics: खरी कुजबुज; ‘त्‍या’ मंत्री, आमदारांच्‍या गोटात खळबळ

Goa Leopard Accident: ..अचानक बिबट्या आला धावत, दुचाकीला दिली धडक, चालक कोसळला जमिनीवर Watch Video

SCROLL FOR NEXT