जर तुमच्याकडे देखील ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) किंवा फसवणुकीचे प्रकरण असेल, ज्यात तुम्हाला पैशाचे नुकसान सहन करावे लागले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तुम्ही या काही प्रक्रियेचे पालन करुन तुम्हाला झालेले नुकसान भरुन काढू शकता. जर तुम्ही तुमच्या बँकेला (Bank) ऑनलाईन फसवणुकी संबंधित माहिती दिली तर बँक तुमच्या नुकसानीची भरपाई 10 दिवसांच्या आत करेल.
सध्या बँकिंग आणि आर्थिक व्यवहारासंबंधीची बहुतेक कामे ऑनलाइन किंवा डिजिटल पद्धतीने केली जातात. पण, यासोबतच ऑनलाईन फसवणूक आणि फसवणुकीच्या घटनाही खूप वेगाने वाढल्या आहेत. लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान, ऑनलाइन फसवणूक किंवा फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या वर्षी, 27 दशलक्षाहून अधिक नागरिक ऑनलाईन फसवणूकीचे बळी ठरले आहेत. जे लोक ऑनलाइन फ्रॉड करतात, लोकांच्या वैयक्तिक आणि संवेदनशील माहितीद्वारे लोकांची ऑनलाईन फसवणूक करतात. तथापि, आपण काही कार्यपद्धतींचे पालन करुन आपले पैसे देखील वसूल करु शकतो.
ऑनलाइन फसवणुकीच्या बहुतेक घटना बनावट वेबसाइटद्वारे घडतात. बँकिंग मानकांनुसार, अशा ऑनलाईन फसवणूकीला बळी पडलेल्यांना चोरलेल्या पैशांची पूर्ण परतफेड करण्याचा हक्क आहे. अशा घटनांच्या बाबतीत, लोकांनी त्वरित त्यांच्या बँक किंवा संबंधित संस्थेला कळवावे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मते, जर तुम्हाला अनधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहारांमुळे पैशाचे नुकसान झाले असेल आणि जर तुम्ही तात्काळ बँकेला या प्रकरणाची तक्रार केली तर तुमच्या पैशांची परतफेड केली जाईल.
आर्थिक फसवणूक झाल्यास बहुतेक बँका आपल्या ग्राहकांचा विमा उतरवतात. बेकायदेशीर पैसे हस्तांतरणामुळे पैशाचे नुकसान झाल्यास, ग्राहकांनी त्वरित त्यांच्या बँकेला कळवावे. त्यानंतर बँक तात्काळ विमा कंपनीला त्यासंबंधीचा पूर्ण तपशील प्रदान करते. त्यामुळे ग्राहकाच्या झालेल्या फसवणूकीचा धोका कमी करण्यास मदत होते. साधारणपणे तुमच्या नुकसानीची भरपाई बँकेकडून 10 दिवसांच्या आत करण्यात येते. अनधिकृत व्यवहारांची भरपाई सामान्यतः बँका आणि विमा कंपन्यांकडून केली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.