SEBI Recruitment 2022

 

Dainik Gomantak

अर्थविश्व

SEBI Recruitment 2022: यंग प्रोफेशनल पदांची भरती; मिळणार 60 हजार पगार

SEBI Recruitment 2022: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने नोकरीची अधिसूचना जारी केली आहे.

दैनिक गोमन्तक

SEBI Recruitment 2022: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने नोकरीची अधिसूचना जारी केली आहे. सिक्युरिटीज मार्केट ऑपरेशन्स (SMO), कायदा, संशोधन आणि माहिती तंत्रज्ञान विभागांमध्ये रिक्त जागांची भरती होणार आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार 25 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. नोटीसनुसार, एकूण या पदांसाठी एकूण 38 जागा रिक्त जागा भरता येणार आहेत. सेबीच्या यंग प्रोफेशनल प्रोग्राम अंतर्गत, उमेदवारांची सुरुवातीला एका वर्षासाठी नियुक्ती केली जाईल. यानंतर, हा कालावधी प्रत्येकी एक वर्षासाठी वाढविला जाऊ शकतो. मात्र हा कार्यकाळ उमेदवारांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. SEBI यंग प्रोफेशनल रिक्रूटमेंट 2022 साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट sebi.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

शैक्षणीक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी वित्त व्यवस्थापनमध्ये पदवी उत्तीर्ण केलेली असावी किंवा CA/CMA मध्ये किमान 50% गुण मिळविलेले असावेत. CFA च्या तिन्ही लेवल उत्तीर्ण केलेल्या असाव्यात. तसेच, उमेदवारांना संबंधित कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा. प्रोफेशनल (लॉ) मध्ये किमान 60% गुणांसह पदवी उत्तीर्ण असावे आणि एक वर्षाचा अनुभव असावा. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पात्रताही मागवण्यात आल्या आहेत. वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे या बरोबरच उमेदवारांना अधिक तपशीलांसाठी अधिसूचना पाहण्याचा सल्ला सेबीने दिला आहे.

वेतनश्रेणी

यंग प्रोफेशनल पदावर निवड झाल्यानंतर उमेदवाराला दरमहा 60 हजार रुपये पगार मिळेल. तसेच, मुंबईबाहेरील उमेदवारांना निवासाच्या सोयही केली जाईल. मात्र उमेदवाराला फक्त एका डोमेनसाठी अर्ज करण्याची परवानगी असेल. एकाच/वेगळ्या डोमेन अंतर्गत अनेक अर्जांमुळे उमेदवारी रद्द केली जाईल.

निवड प्रक्रिया

अर्ज आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यामध्ये दोन मुलाखती होतील, पहिली पूर्व मुलाखत, या मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अंतिम मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Waste Management Project: गोव्यातील दोन कचरा प्रकल्प रखडले! बायंगिणीला कोर्टाचा अडथळा, वेर्णाला पर्यावरण मंजुरीची प्रतीक्षा

River Pollution: म्हापसा नदीच्या पाण्यात फिकल कोलिफॉर्म 17 पट जास्त! प्रदूषणाच्या अहवालाने चिंता वाढवली

Baba Vanga Prediction: 2026 संपण्यापूर्वी जगाचा विनाश होणार? बाबा वेंगा यांच्या कथित भविष्यवाणीने जगभरात खळबळ, नेमकं काय सांगितलंय भाकितात?

खरी कुजबुज: 'तो' आवाज कुणाचा?

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT