Reserve Bank Of India Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI चा मोठा निर्णय, आता 'या' 20 देशांतील प्रवासी घेऊ शकणार UPI पेमेंटचा लाभ

Reserve Bank of India: G-20 देशांतील प्रवाशांना भारतात राहताना मोबाइल-आधारित UPI वापरण्याची परवानगी देण्यासाठी एक परिपत्रक जारी करण्यात आले.

Manish Jadhav

Reserve Bank Of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI च्या वापराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. G-20 देशांतील प्रवाशांना भारतात राहताना मोबाइल-आधारित UPI वापरण्याची परवानगी देण्यासाठी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. UPI एक पेमेंट प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर मोबाईल अ‍ॅपवर अनेक बँक खाती एग्रीगेट केली जाऊ शकतात.

बँक खात्यात कुठूनही पैसे ट्रान्सफर करु शकता

याद्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यातून पैसे दुसऱ्या बँक (Bank) खात्यात कुठूनही ट्रान्सफर आणि ऑर्डर करु शकता. भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांना आणि अनिवासी भारतीयांना ते वापरण्याची परवानगी आरबीआयने आधीच जाहीर केली होती.

RBI च्या वतीने सांगण्यात आले की, G-20 देशांतील प्रवाशांना निवडक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर येण्यापासून ही सुविधा सुरु होईल. यानंतर, ही सुविधा देशातील सर्व प्रवेश पॉइंट्सवर जारी केली जाईल. भारताने 1 डिसेंबर 2022 रोजी G-20 चे अध्यक्षपद स्वीकारले. G-20 हा जगातील विकसित आणि विकसनशील देशांचा मंच आहे.

कोणत्या देशांचा समावेश आहे

यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया (Australia), ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे . UPI द्वारे पेमेंट जानेवारीमध्ये मासिक आधारावर 1.3 टक्क्यांनी वाढून सुमारे 13 लाख कोटी रुपये झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT