RBI Monetary Policy: कर्जदारांना दिलासा नाहीच! हफ्ता आणखी वाढणार; RBI चे पतधोरण जाहीर

रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ, जीडीपी 7 टक्के राहण्याचा अंदाज
RBI Monetary Policy
RBI Monetary PolicyDainik Gomantak
Published on
Updated on

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI मॉनेटरी पॉलिसी) 2022-23 या आर्थिक वर्षातील अखेरच्या पतधोरण बैठकीतील निर्णय आज जाहीर करण्यात आले. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सकाळी एमपीसीच्या बैठकीतील निकालांची माहिती दिली.

यात रेपो दरांत दरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक ज्या व्याजदराने इतर बँकाना कर्ज देते तो व्याजदर.

RBI Monetary Policy
Earthquake Zones in India: भारतात 'या' 8 राज्यांना आहे भुकंपाचा सर्वाधिक धोका... जाणून घ्या भूकंपप्रवण क्षेत्रे

रिझव्‍‌र्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) बैठक सोमवारी, 6 फेब्रुवारी रोजी झाली आणि आज, 8 फेब्रुवारी रोजी त्याचे निर्णय जाहीर करण्यात आले. 2022-23 या आर्थिक वर्षातील हे शेवटचे पतधोरण आहे .

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, MPC ने रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे देशातील रेपो दर 6.50 टक्के झाला आहे, जो पूर्वी 6.25 टक्के होता. एमपीसीच्या 6 पैकी 4 सदस्यांनी या निर्णयाच्या बाजूने मतदान केले.

रेपो दरातील ही सलग सहावी वाढ आहे अशा प्रकारे, सलग 6 वेळा दर वाढवून, आरबीआयने रेपो दरात एकूण 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे आणि तो 6.50 टक्क्यांवर आला आहे.

RBI Monetary Policy
Turkey Earthquake: तुर्कीच्या भुगर्भात नेमकं चाललंय तरी काय? देश 10 फूट खचला...

गर्व्हनर दास यांच्या इतर घोषणा

शक्तिकांत दास म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेतील चढ-उतार आणि महागाईच्या आकडेवारीचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे पण जागतिक आव्हानांनुसार निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक वर्ष 2023 साठी भारताच्या जीडीपीचा अंदाज 7 टक्के वर्तविण्यात आला आहे.

2023-24 या आर्थिक वर्षात महागाईचा दर 4 टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे. आरबीआयने एमएसएफ दर 6.75 टक्क्यांपर्यंत वाढवला असून तो 0.25 टक्क्यांनी वाढला आहे. एमएसएफ 6.50 टक्क्यांवरून 6.75 टक्के केला आहे.

दरम्यान, आरबीआयच्या पतधोरणाच्या घोषणेपूर्वी, बँक निफ्टीचे जवळपास सर्व शेअर्समध्ये तेजी दिसून येत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com