RBI  Dainik Gomantak
अर्थविश्व

Reserve Bank of India: आरबीआयने 'या' चार बँकांना ठोठावला मोठा दंड, यापैकी तुमचे कोणत्या बँकेत खाते आहे?

Reserve Bank of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी चार सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे.

Manish Jadhav

Reserve Bank of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी चार सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने दंड ठोठावलेल्या बँकांपैकी एक बिहारमधील तर तीन महाराष्ट्रातील आहेत.

RBI ने ज्या बँकांना दंड ठोठावला आहे, त्यामध्ये तापिंदु अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, इस्लामपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मंगल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांचा समावेश आहे.

दरम्यान, जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने द तापिंदु अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पाटणाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या निर्देशांचे पालन करण्यात बँक अपयशी ठरली होती.

इस्लामपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, महाराष्ट्रवर बँकिंग नियमन कायदा, 1949 आणि केवायसी निर्देश, 2016 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्याबदल्यात बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

दुसरीकडे, महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., महाराष्ट्राला काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल, बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR Act), पर्यवेक्षी कृती फ्रेमवर्क (SAF) अंतर्गत आरबीआयने जारी केलेल्या विशिष्ट निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

याशिवाय, मध्यवर्ती बँकेने मुंबईतील (Mumbai) मंगल सहकारी बँक लिमिटेडला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने ठोठावलेल्या दंडाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. दंडाची ही रक्कम बँकेलाच भरावी लागते, त्याचा ग्राहकांशी काहीही संबंध नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT