RBI Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI Imposes Penalty: येस बँक आणि ICICI बँकेवर RBI ची मोठी कारवाई, करोडोंचा ठोठावला दंड

RBI Imposes Penalty: रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर मोठी दंडात्मक कारवाई केली आहे.

Manish Jadhav

RBI Imposes Penalty: रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. आरबीआयने येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर कारवाई करत कोटींचा दंड ठोठावला. बँकिंग नियामकाचे (Banking Regulator) म्हणणे आहे की, येस बँक आणि आयसीआयसीआय बँक मध्यवर्ती बँकेच्या अनेक नियमांचे उल्लंघन करत आहेत. यामुळे येस बँकेला 91 लाख रुपये आणि आयसीआयसीआय बँकेला 1 कोटींचा दंड (Penalty) ठोठावण्यात आला आहे.

त्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला

आरबीआयने (RBI) अलीकडेच सांगितले होते की, दोन्ही बँका अनेक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात अपयशी ठरल्या. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, येस बँकेवर ग्राहक सेवा आणि अंतर्गत आणि कार्यालयीन खात्यांशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अशी अनेक प्रकरणे आरबीआयसमोर आली ज्यात बँकेने अनेक खात्यांमधून पर्याप्त बॅलन्स नसल्याने चार्ज वसूल केला. तसेच, अंतर्गत आणि कार्यालयीन खात्यांमधून बेकायदेशीर कामे केली जात होती.

आरबीआयला आपल्या मूल्यांकनात असेही आढळून आले की, 2022 मध्ये येस बँकेने अनेक वेळा असे केले होते. बँकेने आपल्या ग्राहकांच्या नावे काही इंटरनल अकाउंट उघडली आणि ती चालवली. सूचनांचे पालन न केल्याने बँकेला 91 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

आयसीआयसीआय बँकेवर हा आरोप करण्यात आला

दरम्यान, ICICI बँक लोन आणि ॲडव्हान्सशी संबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळली आहे. यासाठी बँकेला एक कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. बँकेने अपूर्ण तपासाच्या आधारे मोठ्याप्रमाणात लोन मंजूर केले, त्यामुळे बँकेला आर्थिक धोक्याचा सामना करावा लागला. आरबीआयच्या तपासात बँकेच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेतील त्रुटी समोर आल्या. बँकेने अनेक प्रकल्पांची व्यवहार्यता आणि कर्ज परतफेड क्षमतेचे तपशीलवार विश्लेषण न करता लोन मंजूर केले होते.

शेअरवर काय परिणाम झाला?

सोमवारी येस बँकेचा शेअर बीएसईवर 0.010 रुपयांच्या वाढीसह 23.04 रुपयांवर बंद झाला. त्याचवेळी, आयसीआयसीआय बँकेचे शेअर 2.10 रुपयांनी घसरला आणि 1,129.15 रुपयांवर बंद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT