Ration Card Latest News Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: राशनकार्डधारकांचे बल्ले-बल्ले, यापुढे या लोकांना मिळणार दुप्पट राशन

Ration Card Latest News: तुम्हीही राशन कार्डद्वारे सरकारकडून मोफत राशन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

दैनिक गोमन्तक

Ration Card Latest News: तुम्हीही राशन कार्डद्वारे सरकारकडून मोफत राशन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. शासनाकडून राशनकार्डधारकांसाठी वेळोवेळी बदल केले जातात.

अलीकडेच, केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण खाद्य योजना (PMGKAY) डिसेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे. यानंतर हरियाणातील लाखो राशनकार्डधारकांची नावे यादीतून वगळण्यात आली. ज्यांची नावे वगळण्यात आली त्यापैकी अनेकजण अजूनही नाराज आहेत.

वार्षिक उत्पन्न 1.80 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे

या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले होते की, 'जर एखाद्या कुटुंबातील व्यक्ती नोकरी करत आहे किंवा वार्षिक उत्पन्न 1.80 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा लोकांची नावे पिवळ्या राशनकार्डमधून (Ration Card) काढून टाकण्यात आली आहेत.'

गरजू लोकांना राशन वाटप करणे हा त्यामागील सरकारचा उद्देश आहे. ज्यांची नावे राशनकार्डमधून वगळण्यात आली आहेत, त्यांचे राशनकार्ड पुन्हा बनवली जाणार आहेत, असेही ते म्हणाले. यापैकी काही लोक पिवळे किंवा बीपीएल कार्डसाठी पात्र नाहीत.

एका महिन्यात सर्व कुटुंबांचे कार्ड बनवले जातील

जी कुटुंबे आर्थिक परिस्थितीच्या आधारावर शासनाकडून राशन घेण्यास पात्र आहेत, त्यांना राशनचा पूर्ण लाभ दिला जाईल, असे ते म्हणाले. अशा कुटुंबांसाठी राशन ठेवले जाणार नाही. महिन्याभरात सर्व कुटुंबांची नवीन राशनकार्डे बनवण्यात येणार आहेत. ज्यांची नावे चुकीच्या पद्धतीने यादीतून वगळण्यात आली आहेत, त्यांना पुढील महिन्यात राशनकार्ड तयार झाल्यावर दुप्पट राशन मिळेल, असे आदेशही त्यांनी दिले.

दुसरीकडे, राज्यात राशन कार्ड बनवण्यासाठी 1 जानेवारी 2023 पासून प्रक्रिया सुरु झाली आहे. हरियाणात (Haryana) बीपीएल राशनकार्ड मिळविण्यासाठी, उमेदवार दारिद्र्यरेषेखालील असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT