Ration Card: मोफत राशन घेणार्‍या करोडो लोकांना मोठा झटका, 'हे' जाणून घ्या नाहीतर...!

Ration Card Latest News: तुम्हीही राशन कार्डद्वारे सरकारच्या मोफत राशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Ration Card Holder
Ration Card HolderDainik Gomantak
Published on
Updated on

Ration Card Latest News: तुम्हीही राशन कार्डद्वारे सरकारच्या मोफत राशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राशन वितरणाशी संबंधित नवीन अपडेट आले आहे. हे अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राशन वाटप करावे लागते. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही राशनचे वाटप झालेले नाही.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, काही जिल्ह्यांमध्ये भारतीय अन्न महामंडळ (FCI) कडून अद्याप तांदूळ पुरवठा केला गेला नाही. त्यामुळे राशनचा पुरवठा होत नाही.

राशनकार्डधारकांना राशन मिळण्यास विलंब झाला

फक्त गहू, साखर, हरभरा, तेल आणि मीठ एफसीआयने काही राशन कोट्याच्या दुकानांमध्ये पोहोचवले आहे. राशन वितरणासाठी या दुकानांपर्यंत तांदूळ पोहोचण्याची वाट पाहत आहे.

यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, लवकरच तांदूळ दुकानात पोहोचणार आहे. तांदूळ राशन दुकानांवर पोहोचल्यानंतर वितरण सुरु केले जाईल. वितरण व्यवस्थेतील गडबडीमुळे कार्डधारकांना जानेवारी महिन्यातील राशन मिळण्यास विलंब होत आहे.

Ration Card Holder
Ration Card Rules: राशनकार्डच्या नियमात मोठा बदल, करोडो लाभार्थ्यांना मिळणार नाही धान्य!

तसेच, राशन दुकानांवर तांदूळ कोटा उपलब्ध नसल्यामुळे पॉइंट ऑफ सेल्स मशीन (PoS) राशन वितरणास परवानगी देत ​​नाही. अशा परिस्थितीत राशनकार्डधारकांना त्यांच्या इच्छेविरुद्धही थांबावे लागत आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून तांदूळ (Rice) पुरवठा करण्यास विलंब का होत आहे, याची माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com