Ration Shop Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: राशनकार्डधारकांचे बल्ले-बल्ले, आता दरमहा मिळणार एवढे पैसे!

Ration Card Latest News: तुम्हीही सरकारच्या मोफत राशन योजनेंतर्गत गहू-तांदूळ वगैरे घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

Ration Card Latest News: तुम्हीही सरकारच्या मोफत राशन योजनेंतर्गत गहू-तांदूळ वगैरे घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अलीकडेच हरियाणा सरकारने बीपीएल राशनकार्डधारक आणि अंत्योदय कार्डधारकांना (AAY) दोन लिटर मोहरीचे तेल मोफत देण्याची घोषणा केली होती.

दरम्यान, जून 2021 मध्ये तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सरकारने राशन डेपोवरील तेलाचे वितरण बंद केले होते. त्याचबरोबर तेलाच्या ऐवजी दरमहा अडीचशे रुपये कार्डधारकांच्या खात्यावर पाठवण्याचे नियोजन करण्यात आले. अशा लोकांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी आली आहे.

आता दरमहा 300 रुपये मिळत असल्याची चर्चा आहे

आता सरकार 250 रुपयांची रक्कम वाढवण्याचा विचार करत आहे. यापूर्वी सरकारने 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. आता हरियाणा सरकारकडून ही रक्कम वाढवून 300 रुपये करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या बदलाचा लाभ बीपीएल आणि एएवाय राशनकार्ड (Ration Card) असलेल्या 32 लाख कुटुंबांना मिळणार आहे. या लोकांना सरकारकडून दरमहा 300 रुपये दिले जातील.

लाखो लिटर तेलाचा साठा शिल्लक आहे

दुसरीकडे, सरकारने (Government) 250 रुपयांची घोषणा केल्यापासून लाभार्थ्यांना तेल मिळत नसल्याचा दावाही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. अशा परिस्थितीत सरकारकडे लाखो लिटर तेलाचा साठा शिल्लक आहे.

मार्चमध्ये या तेलाची एक्सपायरी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे तेल राशनकार्डधारकांमध्ये वितरित करण्याचे आदेश शासनाने जिल्हा अन्न आणि पुरवठा विभागाला जारी केले आहेत.

तसेच, सरकारच्या मोफत राशन योजनेंतर्गत राज्यातील लाखो कार्डधारकांना गहू आणि तांदूळ मोफत दिले जातात. गेल्या काही दिवसांत सरकारने मोफत राशनसोबत मोहरीचे तेल देण्याची घोषणा केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT