Ration Card: मोफत राशन घेणाऱ्यांचे बल्ले-बल्ले, सरकारने सुरु केली नवी योजना; कार्डाशिवाय मिळणार राशन

Ration Card Latest News: तुम्हीही सरकारच्या मोफत राशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारने एक खास योजना सुरु केली आहे, जी ऐकून तुम्हाला आनंद होईल.
Ration Card Holder
Ration Card HolderDainik Gomantak
Published on
Updated on

New Scheme For Ration Card Holders: तुम्हीही सरकारच्या मोफत राशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारने एक खास योजना सुरु केली आहे, जी ऐकून तुम्हाला आनंद होईल.

सरकारच्या (Government) या योजनेनुसार तुमच्याकडे राशनकार्ड नसले तरी तुम्ही मोफत राशनचा लाभ घेऊ शकता. ही योजना उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने सुरु केली आहे. या अंतर्गत यूपी सरकारने फॅमिली आयडी लॉन्च केला आहे.

दरम्यान, कौटुंबिक ओळखपत्राच्या आधारे, लाभार्थ्याला राशन मिळवण्यासाठी राशनकार्डची गरज भासणार नाही. राशनकार्डधारकाला केवळ कौटुंबिक ओळखपत्राच्या आधारे राशनची सुविधा मिळू शकेल. या आयडीच्या आधारे कुटुंबाला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील.

सरकारने सुरु केलेल्या या सुविधेत तुमचे राशनकार्ड (Ration Card) फाटले किंवा हरवले तर काळजी करण्याची गरज नाही. तसेच तुम्हाला नवीन राशन कार्ड बनवण्याची गरज नाही.

Ration Card Holder
Ration Card: मोफत राशन घेणार्‍यांचे बल्ले-बल्ले, सरकारने केली मोठी घोषणा

आता तुमचे सर्व काम फॅमिली आयडीच्या आधारे केले जाईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा फॅमिली आयडी बनवायचा असेल तर त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया-

फॅमिली आयडी बनवण्याची प्रक्रिया

सर्वप्रथम, तुम्हाला यूपी सरकारच्या https://familyid.up.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. आता येथे मागितलेली सर्व माहिती एंटर करुन हा फॉर्म सबमिट करावा लागेल.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचा फॅमिली आयडी क्रमांक तयार होईल.

हा नंबर तुमच्याकडे सुरक्षित ठेवा. ते अशा ठिकाणी नोंदवा, जिथून गरज पडल्यास लगेच काढता येईल.

Ration Card Holder
Ration Card: मोफत राशन घेणार्‍या करोडो लोकांना मोठा झटका, 'हे' जाणून घ्या नाहीतर...!

तसेच, तुम्ही फक्त फॅमिली आयडीच्या आधारे राशन दुकानातून मोफत किंवा स्वस्त राशनच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. हा फॅमिली आयडी फक्त तुमच्या कुटुंबाची खास ओळख दाखवण्यासाठी काम करेल. एवढेच नाही तर या 12 अंकी फॅमिली आयडीच्या आधारे तुम्ही मोफत राशनचा लाभ घेण्यासोबतच जन्म प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र किंवा उत्पन्न प्रमाणपत्रासाठी अर्ज करु शकाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com