Ration Card: तुमचा डीलरही कमी राशन देतोय? एका दिवसातच येईल लाईन; जाणून घ्या

Ration Card Rules: गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्व प्रकारच्या योजना राबवल्या जातात.
Ration Shop
Ration ShopDainik Gomantak

Ration Card Rules: गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्व प्रकारच्या योजना राबवल्या जातात. मोदी सरकार आणि विविध राज्य सरकारेही गरिबांना राशनकार्डच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवत आहेत.

अलीकडेच, केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (PMGKAY) अंतर्गत 1 जानेवारी 2024 पर्यंत मोफत राशन देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, जवळपास सर्वच राज्यांमध्ये राशनकार्डधारकांना अनुदानाच्या दराने राशन मिळत आहे.

Ration Shop
Ration Card: मोदी सरकारचा राशनकार्डधारकांना मोठा झटका, बंद केली 'ही' सुविधा!

मोफत अन्नधान्य मिळण्याची सुविधा

प्रत्येक राज्य सरकारकडून राज्यातील रहिवाशांना राशनकार्ड (Ration Card) जारी केले जाते. केवळ राशनकार्डद्वारेच लाभर्थ्यांना कमी किमतीत किंवा मोफत राशन मिळू शकते. काहीवेळा लाभार्थ्यांना कमी राशन मिळते, असेही अनेकवेळा दिसून आले आहे. पण तुम्हाला अशी कोणतीही अडचण येत असेल, तर त्यासाठी सरकारने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे.

डीलरचा परवाना सस्पेंड केला जाऊ शकतो

या हेल्प लाईन्स पूर्णपणे टोल फ्री आहेत. राशनशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुम्ही या नंबरवर कॉल करु शकता. ही तक्रार राशनकार्डधारकांनीच करावी. तक्रार आल्यावर चौकशी केली जाईल.

तुमचा आरोप खरा ठरला तर डीलरचा परवानाही सस्पेंड केला जाऊ शकतो. प्रत्येक राज्यानुसार सरकारने वेगवेगळे टोल फ्री नंबर जारी केले आहेत. तुम्ही तुमच्या राज्यानुसार कॉल करुन तक्रार नोंदवू शकता.

Ration Shop
Ration Card 2023: मोठा निर्णय! केवळ हेच लोक बनवू शकणार राशनकार्ड, 'ही' आहे प्रक्रिया

राज्यानुसार हेल्पलाईन नंबर

उत्तर प्रदेश - 18001800150

उत्तराखंड - 18001802000, 18001804188

पश्चिम बंगाल - 18003455505

महाराष्ट्र- 1800224950

पंजाब - 180030061313

राजस्थान - 18001806127

गुजरात- 18002335500

मध्य प्रदेश- 07552441675, हेल्पडेस्क क्रमांक: 1967/181

आंध्र प्रदेश - 18004252977

अरुणाचल प्रदेश - 03602244290

आसाम - 18003453611

Ration Shop
Ration Card: राशनकार्डधारकांचे बल्ले-बल्ले, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

बिहार- 18003456194

छत्तीसगड- 18002333663

गोवा- 18002330022

हरियाणा - 18001802087

हिमाचल प्रदेश - 18001808026

झारखंड - 18003456598, 1800-212-5512

कर्नाटक- 18004259339

केरळ- 18004251550

मणिपूर- 18003453821

मेघालय- 18003453670

मिझोराम- 1860222222789, 18003453891

नागालँड- 18003453704, 18003453705

ओडिशा - 18003456724 / 6760

Ration Shop
Ration Card: राशनकार्डधारकांचे बल्ले-बल्ले, मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय!

सिक्कीम - 18003453236

तामिळनाडू - 18004255901

तेलंगणा - 180042500333

त्रिपुरा- 18003453665

दिल्ली - 1800110841

जम्मू - 18001807106

काश्मीर - 18001807011

अंदमान आणि निकोबार बेटे - 18003433197

चंदीगड - 18001802068

दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव - 18002334004

लक्षद्वीप - 18004253186

पुडुचेरी - 18004251082

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com