PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Public Provident Fund Scheme: पीपीएफमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी खूशखबर, सरकारने दिली महत्वाची अपडेट

Public Provident Fund Scheme: केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या योजना मध्यमवर्गीयांसाठी चालवल्या जातात.

Manish Jadhav

Public Provident Fund Scheme: केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या योजना मध्यमवर्गीयांसाठी चालवल्या जातात. यामध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगल्या परताव्यासह सुरक्षिततेची हमी मिळते. येथे पैसे गुंतवून तुम्ही दीर्घकालीन चांगले परतावा देखील मिळवू शकता.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ ही देखील यापैकी एक योजना आहे. जर तुम्ही PPF (Public Provident Fund) मध्ये देखील गुंतवणूक केली असेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याची 5 तारीख लक्षात ठेवावी. होय, तुम्ही 5 तारीख लक्षात ठेवून पैसे गुंतवल्यास तुम्हाला अधिक फायदा होईल. याबाबतची माहितीही केंद्राकडून देण्यात आली आहे.

15 तारखेपर्यंत पैसे जमा करणे आवश्यक आहे

जर तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक (Investment) केली तर तुम्हाला हे समजले पाहिजे की, तुम्हाला महिन्याच्या 15 तारखेपर्यंत पैसे जमा करणे आवश्यक आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला त्या महिन्याचे व्याज मिळणार नाही.

तुम्ही पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करु शकता. 20 तारखेच्या आसपास तुम्ही पीपीएफ खात्यात पैसे जमा केलेत तर समजून घ्या की, तुम्हाला त्या महिन्याचे व्याज मिळणार नाही. तुम्ही 5 एप्रिल किंवा त्यापूर्वी पैसे जमा केल्यास तुम्हाला त्याचा आणखी फायदा होईल.

व्याज दर

जून तिमाहीत अर्थ मंत्रालयाने केलेल्या पुनरावलोकनाच्या आधारे, सध्या PPF वर वार्षिक 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. अर्थ मंत्रालयाने पीपीएफच्या व्याजदरात (Interest Rate) बराच काळ बदल केलेला नाही.

प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपासून आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेदरम्यान जी काही किमान शिल्लक आहे, त्याच महिन्यात व्याज जोडले जाते. जर तुम्ही 5 तारखेनंतर पैसे जमा केले तर तुम्हाला त्यावर पुढील महिन्यासाठी व्याज मिळेल.

किती खाती उघडता येतील

जर तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते उघडायचे असेल, एक व्यक्ती फक्त एकदाच खाते उघडू शकतो. जर तुम्ही आधीच दोन खाती चालवत असाल, तर सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, 12 डिसेंबर 2019 नंतर उघडलेले एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते बंद केले जातील.

तसेच, अशा खात्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. याशिवाय, एकाधिक PPF खात्यांचे विलीनीकरण देखील सरकारने प्रतिबंधित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खराब रस्ते, दूषित पाणी अन् बेरोजगारी; केपेतील नागरिकांनी आपच्या नेत्यांसमोर मांडल्या समस्या

Budh Gochar 2026: नोकरी-व्यवसायात प्रगती आणि धनलाभ! 2 डिसेंबरपासून 5 राशींचे चमकणार नशीब; आयुष्यात येणार आनंदाचे क्षण

ST Reservation: प्रियोळमध्ये एसटी आरक्षणाला विरोध; 3 हजार मतदारांच्या सह्यांसह राज्यपालांना निवेदन

ABVP Goa University Election: गोवा विद्यापीठात अभाविपचा क्लीन स्वीप; सर्व 9 जागांवर विजय, एनएसयूआयचा धुव्वा

Viral Post: हद्दच झाली राव! नोकरीसाठी अर्जच केला नाही, पण कंपनीकडून आला थेट 'रिजेक्शन मेल'; जॉब मार्केटची अवस्था पाहून नेटकऱ्यांनी मारला डोक्यावर हात

SCROLL FOR NEXT