PPF Scheme Interest Rate: केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये तुम्हाला भरघोस व्याजाचा लाभ मिळतो. जर तुम्ही सरकारी योजना PPF मध्ये तुमचे खाते (PPF Account) उघडले असेल, तर लवकरच तुम्हाला सरकारकडून मोठी बातमी मिळू शकते.
जून अखेरपर्यंत सरकार सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत मोठे बदल करु शकते. सरकार जून महिन्यात पीपीएफचे व्याजदर वाढवू शकते. अल्पबचत योजनेच्या व्याजदरांचे सरकार दर 3 महिन्यांनी पुनरावलोकन करते.
सरकारने 2020 मध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत शेवटची वाढ केली. यानंतर 1 एप्रिल 2022 रोजी पीपीएफचे व्याजदर (Interest Rate) 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्के करण्यात आले. त्यानंतर या योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
तसेच, केंद्र सरकारने पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यावेळी पीपीएफ खातेधारकांना आशा आहे की, जून 2023 च्या अखेरीस सरकार व्याजदर वाढवू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टॅक्स रिटर्ननंतर, या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर 10.32 टक्के व्याजाचा लाभ मिळतो. त्याचवेळी, इतर योजनांपेक्षा आधीच अधिक व्याज मिळत आहे.
तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करु शकता. तुम्ही ते तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून (Bank) कुठेही खाते उघडू शकता. 1 जानेवारी 2023 पासून, सरकार या योजनेत 7.1 टक्के दराने व्याजाचा लाभ देत आहे. तर PPF योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्ष आहे.
तुम्हाला पीपीएफ स्कीममध्ये कर सवलतीचा लाभही मिळतो. या योजनेत तुम्ही कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. या योजनेतील व्याजातून मिळणारी रक्कमही करमुक्त आहे. या योजनेत 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कर्जासाठी अर्जही करु शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.