prices of cooking oil used in kitchen have gone up  Dainik Gomantak
अर्थविश्व

भाज्या स्वस्त पण, खाद्यतेलाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य चिंतेत आहे त्यातच पेट्रोल आणि विजेच्या दराने महागाईत भर घातली

दैनिक गोमन्तक

स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या रेशनच्या बिलात सातत्याने वाढ होत आहे. खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच पेट्रोल आणि विजेच्या दराने महागाईत भर घातली. यामुळे डिसेंबर 2021 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 5.59% वर पोहोचला आहे. हा आकडा भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या महागाई दराच्या कमाल मर्यादेच्या अगदी जवळ आहे.

अन्नधान्याच्या वाढत्या किमती

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने बुधवारी किरकोळ महागाई दर डिसेंबर 2021 ची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार अन्नधान्य आणि रेशनच्या किमतीत वाढ झाल्याने महागाईचा दर वाढला आहे. डिसेंबरमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ४.०५ टक्के झाला आहे. जो नोव्हेंबर 2021 मध्ये केवळ 1.87% होते.

भाज्या स्वस्त झाल्या, खाद्यतेलाने रडवले

सरकारच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये, भाज्यांच्या महागाईचा दर गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत कमी झाला आहे आणि त्यात 2.99% ची घट झाली आहे. या कालावधीत खाद्यतेलाच्या दरात 24.32% आणि इंधन आणि विजेच्या दरात 10.95% वाढ झाली आहे

सलग तिसऱ्या महिन्यात महागाई वाढली

यापूर्वी, नोव्हेंबर 2021 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 4.91% होता, ऑक्टोबरमध्ये 4.48% होता. तर सप्टेंबर 2021 मध्ये ऑगस्ट 2021 च्या तुलनेत हा दर 4.35% पर्यंत खाली आला होता. ऑगस्ट 2021 मध्ये हा आकडा 5.3% होता. तर गेल्या वर्षी डिसेंबर 2020 मध्ये हा दर 4.59% होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने महागाई दरासाठी 4% चे लक्ष्य ठेवले आहे. डिसेंबर 2021 चा किरकोळ चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या कमाल मर्यादेच्या अगदी जवळ पोहोचला आहे. तर महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दर आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये 9 वेळा कोणताही बदल केलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT