Aadhar Card Updates: डेमोग्राफिकसाठी 50 तर बायोमेट्रिकसाठी 100 रुपये शुल्क निश्चित

आधार कार्ड संदर्भात काही तक्रार असल्यास 1947 वर कॉल करू शकता किंवा uidai.gov.in ला भेट देऊन आधारशी संबंधित अपडेटसाठी जास्त पैसे आकारले जात असल्याची तक्रार करू शकता.
Aadhar Card Updates
Aadhar Card UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

आधार कार्ड, भारतातील सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे, सध्याच्या काळात आपल्या सर्वांसाठी (Aadhar Card Updates) खूप महत्त्वाचे आहे. आधार कार्ड (Aadhaar card) नसल्यास आपली अनेक महत्त्वाची कामे थांबू शकतात. आधार कार्डाशिवाय सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. भारतात (India) आधार कार्ड केवळ प्रौढ आणि वृद्धांसाठीच नाही तर लहान मुलांसाठीही खूप महत्त्वाचे आहे. मुलांच्या शाळा प्रवेशासाठी आणि अनेक प्रकारच्या सरकारी योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. गरज भासल्यास आधार कार्डमध्येही बदल करता येतील. देशात आधार कार्ड जारी करणाऱ्या UIDAI ने वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळे शुल्क निश्चित केले आहेत.

Aadhar Card Updates
Income Tax Return: भरण्याची अंतिम मुदत आता 15 मार्चपर्यंत वाढवली

UIDAI नुसार, जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये कोणतीही डेमोग्राफिक अपडेट करायची असेल, तर त्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जातात. याशिवायच बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये शुल्क आहे. तर, मुलांसाठी आवश्यक असलेली आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत आहेत. मात्र, लोकांकडून ठरलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याचे अनेकवेळा दिसून येते. UIDAI विहित मर्यादेपेक्षा जास्त शुल्क आकारण्याच्या विरोधात आहे.

UIDAI ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आधार सेवेसाठी लोकांपेक्षा जास्त शुल्क आकारणाऱ्या कोणत्याही एजन्सीच्या विरोधात ते ठाम आहेत. UIDAI ने ट्विटमध्ये म्हटले आहे की मुलांसाठी आधार नोंदणीसाठी आणि आवश्यक असल्यास बायोमेट्रिक्स अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

Aadhar Card Updates
ऑनलाइन इन्शुरन्स फ्रॉडसापासून कसे वाचावे, जाणून घ्या

तुम्‍ही तुमच्‍या आधारमध्‍ये नुकतेच काहीतरी अपडेट केले असेल, ज्यासाठी जास्त पैसे आकारले गेले आहेत किंवा आता तुमच्याकडून कोणत्याही अपडेटसाठी जास्त पैसे मागितले जात असतील, तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. तुम्ही 1947 वर कॉल करू शकता किंवा uidai.gov.in ला भेट देऊन आधारशी संबंधित अपडेटसाठी जास्त पैसे आकारले जात असल्याची तक्रार करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com