ऑनलाइन इन्शुरन्स फ्रॉडसापासून कसे वाचावे, जाणून घ्या

अधिकाअधिक युजर्स इंटरनेटशी (Internet) जोडले जाता असल्याने सायबर गुन्हे देखील वाढत आहेत.
avoid online insurance fraud
avoid online insurance fraud Dainik Gomantak
Published on
Updated on

कोरोना विषाणुमुळे आपल्या जीवनात अनेक बदल घडून आले आहेत. याने कार्पोरेट मॉडेल्स, नेटवर्क आणि ग्राहक टचपॉइंट्समध्ये डिजिटल परिवर्तन घडवून आणले आहे. यामुळे व्यवसाय आणि ग्राहक दोन्ही डिजिटल सेवांवर अवलंबून आहेत. परंतु यामुळे फसवणुकीचे प्रकार देखील वाढले. अधिकाअधिक युजर्स इंटरनेटशी (Internet) जोडले जाता असल्याने सायबर गुन्हे देखील वाढत आहेत. यामुळे ऑनलाइन अनेक लोकांची फसवणूक केली जाते. फसवणुकीपासून कसे वाचावे हे जाणून घेऊया. (online insurance fraud)

* ऑनलाइन इन्शुरन्स फ्रॉड कसे टाळावे

1) आपल्या विमा एजंटची माहिती तपासून घ्यावी:

विमा कंपन्यांच्या वतीने काम करणाऱ्या सर्व एजंटानी IRDA च्या कठोर नियमानुसार (Rules) कठोर प्रशिक्षण घेतले पाहिजे आणि ओळखीचा पुरावा मिळवावा. एखाद्या प्रतिनिधीने तुमच्याशी संपर्क साधल्यास, त्यांची ओळख विचारा, त्यांची माहिती लिहून घ्यावी आणि नंतर त्यांची ओळख तपासून पाहण्यासाठी विमा कंपन्यांच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करावे.

2) पॉलिसीची गोपनीयता ठेवावी:

अनोळखी व्यक्तीला तुमच्या पॉलिसीचे कागदपत्रे दिल्याने फसवणूक होऊ शकते. फसवणूक करणारा विमा प्रतिनिधि म्हणून तुमच्याकडून पॉलिसीबद्दल माहिती मागू शकतो. अशावेळी तुम्ही अधिक सतर्कता बाळगली पाहिजे.

avoid online insurance fraud
एलआयसी आयपीओ बद्दल मोठा निर्णय

3) पॉलिसीचे कागदपत्रे हरवल्यास लगेच तक्रार करावी

तुमचे कागदपत्रे हरवल्यास तुमचे अधिक नुकसान होऊ शकते. यामुळे पॉलिसीचे कागदपत्रे हरवल्यास लगेच तक्रार करावी. तुमचे महत्वाचे कागदपत्रे डिजी लॉकरमध्ये (DigiLocker) ठेवावे आणि गरज पडल्यास त्यांची पत्र तयार करावी.

4) सार्वजनिक नेटवर्कचा वापर करतांना काळजी घ्या

ऑनलाइन इन्शुरन्स (Insurance) फ्रॉड वाढत चालले आहे. स्कॅमर सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क वापरुन तुमची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करू शकतात. या नेटवर्कवर व्यवहार करतांना किंवा वैयक्तिक माहिती प्राप्त करतांना काळजी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com