PPF Balance: सर्वसामान्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून त्यांच्या हितासाठी मोठी पावले उचलली जातात.
त्याचवेळी, लोक या योजनांद्वारे बचत आणि गुंतवणूक देखील करु शकतात. अशीच एक योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. या योजनेद्वारे, लोक बचत आणि गुंतवणुकीसह कर सवलतीचा लाभ घेऊ शकतात.
मात्र, या योजनेत तुम्ही पैसे गुंतवले असतील एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, अन्यथा अडचणी येऊ शकतात. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया...
पीपीएफ योजना ही दीर्घकालीन योजना आहे. या योजनेत 15 वर्षांनंतर मॅच्युरिटी लाभ मिळतो. अशा परिस्थितीत लोकांना दरवर्षी त्यात पैसे गुंतवावे लागतात. सध्या पीपीएफ खात्यात केलेल्या गुंतवणुकीवर (Investment) 7.1 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
तथापि, जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही आर्थिक वर्षात या योजनेत पैसे गुंतवले नाहीत तर त्याला समस्या येऊ शकतात आणि पीपीएफ खाते निष्क्रिय होऊ शकते.
वास्तविक, पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की एका आर्थिक वर्षात पीपीएफ योजनेत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते.
तथापि, लोकांना एका आर्थिक वर्षात PPF खात्यात किमान 500 रुपये गुंतवणे आवश्यक आहे. त्याचवेळी, आयटीआर (ITR) दाखल करताना जुन्या कर प्रणाली अंतर्गत प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत या योजनेद्वारे 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ देखील मिळू शकतो.
जर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात PPF खात्यात 500 रुपये देखील गुंतवले नसतील तर लोकांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो, कारण यामुळे खाते निष्क्रिय होते आणि PPF खात्यावर मिळणाऱ्या व्याजावरही परिणाम होतो.
तसेच, निष्क्रिय खाते पुन्हा सुरु करण्यासाठी शुल्क भरावे लागते. अशा परिस्थितीत, लोकांनी प्रत्येक आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात किमान गुंतवणूक रक्कम जमा करणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.