PNB Dainik Gomantak
अर्थविश्व

PNB आणि ICICI बँकेच्या करोडो ग्राहकांना झटका, आता खर्च करावे लागणार जास्त पैसे!

Bank MCLR Rates 2023: सरकारी आणि खासगी बँकांमध्ये खाती असलेल्या करोडो ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.

Manish Jadhav

Bank MCLR Rates 2023: सरकारी आणि खासगी बँकांमध्ये खाती असलेल्या करोडो ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. तुमचेही बँक खाते असेल तर आता तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील.

ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँकेने MCLR चे दर वाढवले ​​आहेत. त्यामुळे या बँकांमधील खातेदारांच्या ईएमआयमध्ये वाढ झाली आहे. ICICI बँकेने काही कालावधीसाठी व्याजदरात कपात केली आहे, तर पंजाब नॅशनल बँकेने सर्व कालावधीसाठी व्याजदरात वाढ केली आहे.

ICICI बँकेने दर कमी केले

खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेबद्दल बोलायचे झाल्यास, या बँकेने व्याजदरात कपात केली आहे, म्हणजेच ग्राहकांचा ईएमआय कमी झाला आहे. बँकेने ओव्हरनाइट व्याजदर 8.5 टक्क्यांवरुन 8.35 टक्के केला आहे.

याशिवाय 3 महिन्यांसाठीचे दरही 15 बेसिस पॉईंटने कमी केले आहेत. त्याचे दर 8.55 टक्क्यांवरुन 8.40 टक्क्यांवर आले आहेत.

त्याचबरोबर, आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) 6 महिने आणि एक वर्षाच्या कालावधीच्या व्याजदरांबद्दल बोलायचे झाल्यास बँकेने त्यात वाढ केली आहे. यामध्ये बँकेने 5 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. यामध्ये तुम्हाला 8.85 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.

पीएनबीने 1 जूनपासून नवीन दर लागू केले

देशातील सरकारी बँक पीएनबीने सर्व कालावधीसाठी व्याजदर वाढवले ​​आहेत. PNB ने MCLR दर 10 बेसिस पॉईंटने वाढवले ​​आहेत. बँकेचे नवे व्याजदर (Interest rate) 1 जूनपासून लागू झाले आहेत. PNB च्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँकेने ओव्हरनाइट MCLR दर 10 बेस पॉईंट्सने वाढवला ​​आहे, त्यानंतर व्याजदर 8 वरुन 8.10 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

कोणत्या कालावधीसाठी MCLR दर किती झाले आहेत?

याशिवाय, एक महिना, 3 महिने आणि 6 महिन्यांचे दरही वाढले आहेत. एक महिन्याचा व्याजदर 8.20 टक्के, 3 महिन्यांचा व्याजदर 8.30 टक्के, 6 महिन्यांचा व्याजदर 8.50 टक्के झाला आहे. याशिवाय, एक वर्षाचा MCLR दर 8.60 टक्के आणि 3 वर्षांचा MCLR दर 8.90 टक्के करण्यात आला आहे.

ईएमआय वाढला

बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर आपण वेगवेगळ्या कालावधीच्या व्याजदराबद्दल बोललो तर कालपासून तुमचा ईएमआय वाढला आहे. यापुढे तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. याशिवाय, ICICI बँकेने व्याजदरात कपात केली आहे, त्यामुळे तुमचा EMI कमी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT